जळगाव नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन २३ रोजी आर् टी ओ कार्यालयात देणार निवेदन
जळगाव दि.१९(प्रतिनिधी)ऑटोरिक्षा चालक कल्याणकारी मंडळाची नोंदणी फी ५०० रू. व वार्षिक फी ३०० रू. शासनाने तातडीने रद्द करावी तोपर्यंत उतर महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातील ऑटोरिक्षा चालकांनी सदस्य नोंदणी करू नये असे निवेदन दि. २३ मार्च रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देणार आहे.
महाराष्ट्रातील मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि खान्देशातील शहरे आणि ग्रामीण विभागातील ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य संघटनेशी संलग्नीत ऑटो रिक्षा संघटनांच्या प्रमुख पदाधिकारींची बैठक भाई जीवनजी लेन गिरगाव मुंबई येथे नुकतीच पार पडली.ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशांक राव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी प्रदेश सरचिटणीस विलास भालेकर जेष्ठ नेते शंकरजी साळवी यांनी मार्गदर्शन केले ऑटो रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात यावे त्यामार्फत विविध योजना राबविण्यात याव्यात हि मागणी गेली २० वर्षांहून अधिक काळापासून संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासनाकडे केली जात होती ऑटोरिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करत असतांना राज्य शासनाने महाराष्ट्रातील प्रमुख ऑटो रिक्षा चालक मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणे आवश्यक होते परंतु शासनाने कोणाशीही चर्चा न करता एकतर्फी निर्णय घेतला व रिक्षा चालकांना या महामंडळात सदस्य नोंदणी करण्याकरिता ५००/ रू व वार्षिक फी ३००/रू शुल्क भरणे बंधनकारक केलेले आहे हे रिक्षा चालकांवर केला गेलेला अन्याय आहे आमच्या संघटनेने या निर्णयाच्या आधी विरोध केलेला आहे यामुळे बहुतांश रिक्षा चालक मालकांनी महामंडळा मध्ये नोंदणी केलेली नाही रिक्षा चालकांनी महामंडळात नोंदणी करावी म्हणून याकरिता अनेक आरटीओ कार्यालयामध्ये रिक्षा चालक मालकांवर जबरदस्ती केली जात आहे तसेच नोंदणी न केल्यास तुमचे ( परमिट नुतनीकरण पासिंग) इत्यादी काम केले जाणार नाही असे सांगण्यात येते आहे हे कृत्य बेकायदेशीर असून तसेच महाराष्ट्र राज्य सरकारने ऑटो रिक्षांच्या परवाना वितरणावर स्थगिती आणली आहे मात्र इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा ई - रिक्षा यांच्यावर स्थगिती आणली नाही या सरकारच्या दुप्पटी भुमिकेचा बैठकीत निषेध करण्यात आला १) धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळच्या नोंदणी करीता रिक्षा चालकांकडून रू ५००/ प्रवेश फी रू ३००/ वार्षिक फी घेण्याचा निर्णय सरकारने रद्द करावा २) अनेक आरटीओ कार्यालयामध्ये गैर कायदेशीर रित्या रिक्षा चालकांवर महामंडळाची नोंदणी करण्याचा आणरा जाणारा दबाव तातडीने बंद करण्यात यावा ३) इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा ई - रिक्षा यांच्या नोंदणीवर सरकारने तातडीने स्थगिती आणावी या मागण्यांचे निवेदन ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्राच्या सर्व संलग्नीत संघटनांद्वारे सोमवार दिनांक २३ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या आरटीओ कार्यालयात देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने जळगाव प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद वाणी यांच्या नेतृत्वात लेखी निवेदन देण्यात येणार आहे यावेळी समस्त ऑटोरिक्षा चालक मालक संघटना व ऑटो रिक्षा चालक मालक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेने केले आहे.
