व्यसनाधीन भावास संख्ख्या भावाने केले ठार..नारोद गावातील घटना

 व्यसनाधीन भावास संख्ख्या भावाने केले ठार..नारोद गावातील घटना


चोपडा,दि.२२(प्रतिनिधी) तालुक्यातील नारोद येथील सख्ख्या भावाने संख्या व्यसनाधीन भावाला गुळ नदीवरील के.टी.बंधाऱ्यावरून ढकलून गळा दाबून डोक्यात दगड मारून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. आई वडिल व परिवारातील सदस्यांना दारूच्या नशेत तर्र होऊन वारंवार त्रास देण्याच्या प्रकाराला कंटाळून मोठ्या भावाने छोट्या भावाचा दुर्दैवी घात केला आहे. या घटनेने गावभर प्रचंड खळबळ उडाली असून अडावद ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, नारद येथील रहिवासी रोहन पानाचंद पाटील(वय 23वर्षे ) हा घरात रोजच दारू पिऊन ,गांजा  ओढून नशेत धूत्त होत परिवारात धिंगाणा घालून मानसिक त्रास देत होता.तसेच जुगार खेळण्यासाठी पैसे दिले नाहीत तर आरडाओरडा करून भाऊ सुनील व त्यांच्या पत्नीच्या अंगावर धावून जात होता या ज्याच्याला कंटाळून मोठा भाऊ सुनील  याने मनात राग धरून  तो नशेत असतांना  संधी साधत रोहन यास गुळ  नदी पात्रात केटी बंधाऱ्यात  ढकलून खाली पडल्यानंतर गळा दाबून डोक्यात दगड मारून  ठार केले . 

दरम्यान नदीपात्रात युवकाचा मृत्यू आढळून आल्याने बघ्यांनी  पोलीस पाटील विजय पाटील यांना घटनेची माहिती दिली त्यांनी पोलिसांना कळविले असता पोलिसांनी घाता-पाताच्या संशयावरून  तपास सुरू केला असता सुनील च्या चेहऱ्यावरील काटेरी झुडपे यांचे व्रण आढळून आल्याने त्याच पोलिसीखाकी दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

याप्रकरणी पोलिसात  मयताची आई सौ राधाबाई पानानंद पाटील( वय ५० वर्षे )यांच्या तक्रारीवरून अडावद पोलीसात सीसीटीएनएस गुरनं ६०/२०२६  भारतीय न्याय संहिता कलम 103( १) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.घटनास्थळी एसडीपीओ अण्णासाहेब घोलप यांनी भेट दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद तात्यासाहेब वाघ हे करीत आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने