चोपडा शहर पोलिसांच्या टीमची "कोबिंग ऑपरेशन"मध्ये धडाकेबाज कारवाया.. सट्टा,मटका,दारू अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले अन् कायदा मोडणाऱ्यांनाही जोरदार चपराक .. चोपडयात कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या कार्याची वाह वा..!

 चोपडा शहर पोलिसांच्या टीमची "कोबिंग ऑपरेशन"मध्ये धडाकेबाज कारवाया.. सट्टा,मटका,दारू अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले अन् कायदा मोडणाऱ्यांनाही जोरदार चपराक .. चोपडयात कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या कार्याची वाह वा..!

चोपडा दि.११(प्रतिनिधी) :चोपडा शहर पोलीस ठाण्याचे  धडाकेबाज ,नीडर, कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री पवन कुमार  देसले यांनी अवैध धंदे चालकांच्या चांगल्याच नांग्या ठेचण्याचा सपाटा लावला असून अवैध वाहन चालक असो वा विना लायसन ट्रिपल सिट चालक असो, गावठी हातभट्टी दारूअड्डा चालक असो सर्वच स्तरातील गुन्हेगारांवर कायद्याचा  दंडा चालवला असून "कायद्यात  राहाल तर  फायद्यात राहाल"हे  सुतोवाच अधोरेखित करण्यासाठी जोमाने कंबर कसली आहे. विशेष म्हणजे कत्तल खाण्यात गुरांना नेणाऱ्यांचा माज उतरविण्याचे महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार कोंबिंग ऑपरेशन च्या माध्यमातून सट्टा जुगार खेळणाऱ्यांनाही  "सळो की पळो "करून सोडले आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीने चोपडावासीय चांगलाच सुखावला असून न्याय कर्ता अधिकारी लाभल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे. 

कोंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व चाळीसगाव विभाग अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशान्वये चोपडा पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील रामराव पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पवन देसले व त्यांची टीम  चोपडा शहर पोलिस ठाणे हद्दीत जोरदार कामगिरी बजावत असून नुकत्याच दारूबंदीच्या पाच केसेस दाखल केलेल्या आहेत चहार्डी येथील कमळजादेवी प्लॉट भागात पितांबर दंगल कोळी यांची 300 लिटर दारू जप्त केलीआहे.तर रुखनखेडा गावातील भिलाटी भागातील शिवाजी भिका भील याची  २५लिटर गावठी दारू, मामले येथील वसंत पुन्हा भिल यांची 35 लिटर, कारगिल चौकातील तुषार राजेंद्र महाजन यांची 25 लिटर व पाटीलगढीतील पारधीवाढ्यातील राजेंद्र पूनमचंद पारधी यांचे 20 लिटर दारू जप्त करून कडक कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे चोपड्या शहरातील राज पॅलेस मागील भागात प्रशांत ज्ञानेश्वर कोळी, विजय रवींद्र कोळी,भरत माधव गवळी या तिघांवर जुगार प्रकरणी गुन्हा दाखल करून एक लाख 66 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस ठाण्यात येथील१० हीस्ट्रीसीटरांना आणण्यात आले असून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या 16 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

दरम्यान अन्नभेसळ विभागाच्या कायद्या नुसार सिगारेट आणि टोबॅस्को विक्री प्रकरणात मेणबत्ती चौकातील सावित्रीबाई फुले नगरपालिका शाळेच्या जवळील हेमंत पान सेंटर व मातोश्री पान सेंटर या दुकानांवर तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. शिवाय मोटार वाहन कायद्याप्रमाणे विना हेल्मेट तीन जणांवर तीन हजाराच्या दंड करण्यात आला आहे.ट्रीपलसीट तीन जणांवर तीन हजार रुपयांच्या दंड करण्यात आला आहे.मालवाहू वाहनातून इसमांची वाहतूक करणे बद्दल दोन जणांवर एक हजार रुपये प्रमाणे दंड करण्यात आला आहे .विना लायसन्स प्रकरणी सहा जणांवर गुन्हा नोंदवून 3000 चा दंड वसूल करण्यात आला आहे ड्रंक अँड ड्राईव्ह च्या चार केसेस दाखल करण्यात आल्या असून प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे दंड ठोठावण्यात  आला आहे. शहरातील समाजात शांतता व कायदा सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी 15 जणांवर प्रतिबंधित कारवाई करण्यात आली आहे जवळपास पाच हॉटेल व लॉज ची तपासणी करण्यात आली असून पकड वॉरंट म्हणून चार जणांवर तर जमानती वारंट म्हणून सहा जणांवर तर ५१ जणांवर समंस बजावण्यात आला आहे.गेल्या कालखंडात बेपत्ता झालेल्या १६जणांपैकी तपासात तीन जणांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे.

 यांनी घेतली मेहनत

हे कोबींग ऑपरेशन यशस्वीतेसाठी उपविभागीय अधिकारी सुनील पाटील, पोनि पवन देसले यांच्या समवेत ५ दुय्यम अधिकारी व 30 अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखा कडे १ अधिकारी व १०अंमलमदार यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्व टीमच्या कार्याची चोपडा शहरातील नागरिकांनी जोरदार स्वागत केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने