सुदर्शन कॉलनीत दिवसा ढवळ्या चोरी.. अडीच लाखांचा ऐवज पोबारा .. पोलिसांचा जोरदार तपास सुरू

 सुदर्शन कॉलनीत दिवसा ढवळ्या चोरी.. अडीच लाखांचा ऐवज पोबारा .. पोलिसांचा जोरदार तपास सुरू 

छायाचित्र :Ai image

चोपडा दि. ४ (प्रतिनिधी) यावल रोड रस्त्यावरील शहरातील सुदर्शन कॉलनी परिसरात दिवसा ढवळ्या चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून लाकडी कपाटातून दोन लाख 52 हजार रुपयांच्या मुद्देमाल चोरून पोबारा केल्याची घटना घडली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की चोपडा यावर रस्त्यावरील सुदर्शन कॉलनी तील रहिवासी विजय रामकृष्ण महाजन ( प्लॉट नंबर 31 )हे सकाळी 9:50 ते 10:45 वाजेच्या दरम्यान मध्ये त्यांचे पत्नीस क्लास सोडण्यासाठी घरात कुलूप लावून गेले असता अज्ञात चोरट्यांनी घराचे दरवाज्याचे कुलूप तोडून घरातील लाकडी कपाटाचे लॉकर तोडून २लाख रुपये रोख, व१३ग्रम वजनाचे सोन्याचे टोंगल, लहान मुलांच्या कानातील बाह्या,४०भार वजनाचे चांदीचे दागिने असा एकुण २लाख ५२ हजार  रुपये किंमतीचा ऐवज चोरून पोबारा केला.

याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात विजय महाजन यांच्या तक्रारीवरून अज्ञात छोटेविरुद्ध गुरनं 323/ 2026 भारतीय न्याय दंड संहिता 2023 चे कलम 305 (अ) ,331 ( 3) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने