डायल ११२वर खोडसाळ व चुकीचा संदेश देणाऱ्यावर चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल..
चोपडा दि.३(प्रतिनिधी)शहर पोलिसात 112 क्रमांकावर खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या विरवाडे येथील एकावर गुन्हा नोंदविण्यात झाल्याची घटना घडली. एकाने गळफास केली आहेअसा चुकीची माहिती डायल क्रमांकावर दिल्याने पोलिसांची धावपळ झाली. सत्यता पडताळून पाहिले असता कुठल्या असा प्रकार आढळून न आल्याने संबंधित फोन करणाऱ्या कॉलधारकावर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. खोडसाळ व चुकीचा संदेश देणार्यांना चांगलेच महागात पडणार आहे.
याबाबत माहिती अशी की, दि.02/08/2026 दुपारी सकाळी 08.00 ते 22.00 वाजे पावेतो पोकॉ. अतुल अनिल मोरे सोबत पोकॉ योगेश कोळी यांना ड्युटी तक्ताप्रमाणे डायल 112 वर प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे निवारण करणे बाबत कर्तव्य नेमण्यात आले होते. दोघे कर्तव्यावर हजर असतांना डायल 112 चे MDT मशिनवर CFS ID वर तक्रार क्रमांक # CFS 38496975 वर 12.40 वाजता कॉल प्राप्त झाला नमुद कॉल मधील माहीतीचे अवलोकन करता त्यामध्ये # ALI # लँडमार्क-मरी आई मंदीर विरवाडे गावी हे ठिकाण दिले होते. कॉल करणारा इसम मोबाईल क्रमांक धारक 9890824864 हा होता. त्याने कॉल केला होता की, सदर ठिकाणी एका पुरुषाने फाशी घेतली आहे पोलीस मदत हवी आहे. सदर कॉल प्राप्त झाल्याने पोकॉ अतुल मोरे व पोकॉ योगेश कोळी हे शासकीय मोसा क्र.MH 19 EN 4938 या वाहनाने डायल 112 वर आलेल्या कॉल प्रमाणे घटनास्थळी मरीआई मंदिराजवळ, विरवाडे, ता चोपडा येथे रवाना होवुन घटनास्थळी पोहचल्यावर सदर घटनेची चौकशी केली केली असता तशी कोणत्याही प्रकारची घटना घडलेली दिसुन आली नाही. म्हणुन नमुद मोबाईल धारक यास मोबाईल क्र. 8169695419 वरुन संपर्क केला असता त्याने उडवा उडवीच उत्तरे दिली व त्याला बोलवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव रामसिंग भावसिंग बारेला, वय 25 वर्षे, रा. विरवाडे, ता चोपडा, जि जळगाव असे सांगीतले. गावतील पोलीस पाटील महारु हरी कोळी व त्याचे वडील भावसिंग गोटु बारेला यांना बोलावुन घेतल्यावर त्यांच्याकडे विचारपुस करता त्यांनी सांगितले की सदर ठीकाणी अशी कोणत्याही प्रकारची घटना घडली नाही . तसेच कॉलर याच्या वडीलांनी सांगीतले की, तो घरच्यांना नेहमी त्रास देतो व त्याने मुद्दाम पोलीसांना त्रास देण्यासाठी खोटा कॉल केला आहे. म्हणुन खात्री झाल्यावर सदर कॉलर नामे-रामसिंग भावसिंग बारेला यांने डायल 112 ला कॉल करुन चोपडा शहर पोलीस स्टेशनला पोलीसांना खोटी माहीती पुरवली व पोलीसांची दिशा भुल केली म्हणुन पो का अतुल मोरे यांच्या तक्रारीवरून चोपडा शहर पोलिसात भा.न्या.सं कलम-212 प्रमाणे कायदेशीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
