ग. स. सोसायटी कर्मचारी नियंत्रणच्या अध्यक्षपदी मंगेश भोईटे.. कार्यलक्षी कार्यलक्षी संचालकपदी मनोजकुमार पाटील
चोपडा, दि. ३(प्रतिनिधी) : येथील ग. स. सोसायटीकर्मचारी नियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी मंगेश भोईटे यांची, तर कर्ज समितीच्या अध्यक्षपदी मनोज अर्जून माळी यांची निवड करण्यात आली आहे. सोसायटीच्या अध्यक्षा रागिणी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज सभा झाली. त्यात ही निवड करण्यात आली.
दरम्यान कार्यलक्षी संचालकपदी मनोजकुमार पाटील, तर तज्ज्ञ संचालकपदी संदीप पाटील(जामनेर), नितीन साठे (यावल) यांची निवड करण्यात आली. आज झालेल्या बैठकीत ही निवड झाली आहे.
यावेळी उपाध्यक्ष अनिल गायकवाड, सहकार गटाचे अध्यक्ष उदय पाटील, गटनेते अजबसिंग पाटील, संचालक सुनील सूर्यवंशी, योगेश सनेर, अजयराव सोमवंशी, महेश पाटील, भाईदास पाटील, विश्वास पाटील, योगेश इंगळे, अजय देशमुख, रवींद्र सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, नीलेश पाटील, रावसाहेब पाटील, अमरसिंग पवार उपस्थित होते.
