विद्यार्थ्यांचे हितासाठी क्लासेस चालकांना निर्देश..शहर पोलीस ठाण्याचे आणखीन एक चांगले पाऊल.. ................................................................................... अल्पवयीन विद्यार्थ्यांची पिक्चर टाईप हाणामाऱ्यांकडे आगेकूच.. पालकांनी वेळीच सतर्कता बाळगणे गरजेचे ........................................

 विद्यार्थ्यांचे हितासाठी क्लासेस चालकांना निर्देश..शहर पोलीस ठाण्याचे आणखीन एक चांगले पाऊल..

...................................................................................

अल्पवयीन विद्यार्थ्यांची पिक्चर टाईप हाणामाऱ्यांकडे आगेकूच.. पालकांनी वेळीच सतर्कता बाळगणे गरजेचे 

...................................................................................

चोपडा दि.१९(प्रतिनिधी)चोपडा शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पवन कुमार देसले यांनी शहरातील सर्व खाजगी क्लासेस चालकांना विद्यार्थ्यांच्या  हितासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी दखल घेण्याच्या फतवा काढला असून दखल न घेणाऱ्यांवर  कायदेशीर योग्य ती कारवाई केली जाईल असे नोटीसही द्वारे स्पष्ट केले आहे.जवळपास पंचवीस तीस क्लासेसला ही नोटीस बजावण्यात आली आहे.तसेच शाळांनाही ही नोटीस पाठविणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांची गटबाजी पाहता किरकोळ भांडणांपासून ते मोठ्या भांडणांपर्यंत मजल गाठु लागले आहेत. अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीच्या घटना वाढू लागल्या असल्याने एक चिंतेचे कारण पुढे येत आहे. या घटना सध्याच्या स्थितीत क्लासेस व शाळांमध्ये आढळू लागले असल्याने पालकांची चिंता वाढली आहे परिणामी शालेय शिक्षकांचीही डोकेदुखी वाढली आहे. याला वेळीच आळा बसावा म्हणून क्लासेस व शाळा चालकांनी काही खबरदारीचे उपाय घ्यावेत यासाठी ही नोटीस बजावली असल्याचे श्री देसले यांनी म्हटले आहे.

 या नोटीसीत विद्यार्थी/विद्यार्थीनी यांची काळजी व सुरक्षेसाठी करावयाचा उपाययोजना सुचविल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे 

1. क्लास समोरची जागा कव्हर होईल असे CCTV कॅमेरे रस्त्यावर डावी व उजवी बाजू दिसेल असे लावावे.

2. क्लास सुटल्यांवर किंवा भरतांना शिक्षक किंवा आपले सहकारी यांनी थोडा वेळ स्वता बाहेर उभे राहुन लक्ष

ठेवावे. क्लास समोर उभे राहणारे अनोळखी व्यक्ती/मुलगा यांना टोकावे.

3. क्लास मध्ये व बाहेर वाजूस लाईटची व्यवस्था करण्यात यावी.

4. आपल्या क्लासेसच्या आत व बाहेर CCTV कैमेरे बसविण्यात यावे. जेण करुन कोणी विद्यार्थी, मुल मुलींची छेडछाड करणार नाही. किंवा काही विपरीत घटना होणार नाही.

5. क्लासेसला येणा-या विद्यार्थ्यांचा सायकलीसाठी पार्कीगची व सायकल लावण्याची स्टॅण्डची व्यवस्था करण्यात यावी. घटना समजण्यासाठी CCTV कैमेरे मधुन ते स्टॅण्ड दिसायला हवे असे CCTV कैमेरे लावावे.

6. आपल्या क्लासेसचा बाहेर विना कारण कोणालाही थांबू देवू नये.

7. क्लासला येणा-या प्रत्येक व्यक्तीची नोंद आपल्या नोंदवहीत ठेवण्यात यावी.

8. क्लासला गैरहजर राहणा-या किंवा उशिरा येत असणा-या विद्यार्थी यांची त्वरीत त्यांचे पालक यांना फोनव्दारे माहीती दयावी. को आपला पाल्य क्लासला आलेला नाही. किंवा क्लासला येत नाही.

9. क्लासला येणारा प्रत्येक विद्यार्थीनी/मुलगी ही त्यांचे आई किंवा वडील सोबत जात आहे का त्याची माहीती घ्या. तसेच त्यांना त्यांचे आई किंवा वडील सोबत येण्यास विनंती करा.

10. विद्यार्थ्यांना अनोळखी व्यक्ती पासुन दूर राहण्यास सांगा व त्यांना त्यांचाकडुन कोणतीही वस्तु जसे की चॉकलेट, बिस्टकीट, कॅटबरी, पेय पदार्थ चहा असे घेण्यास नकार दया. तसेच अनोळखी व्यक्तीचा वाहनावर बसण्यास व घेण्यात नकार दया. तसेच मोबाईल नंबर कोणास देवु नये किंवा कोणाला मोबाईल वरुन कॉल करु नये.

11. विद्यार्थाना रोड क्रास करतांना आपल्या सहकारी मार्फत त्यांना रोड क्रास करण्यास समजावुन सांगा,

12. अन्यथा काही विपरीत घटना घडल्यास आपल्या विरुध्द हया नोटीसचा वापर करता येईल 13. काही संशयास्पद आढळल्यास किंवा काही कोणी त्रास दिल्यास त्वरीत पोलीस स्टेशनला (02586-220333), पोलीसांना अथवा डायल 112 वर संपर्क साधा.

तरी क्लासेस व शाळेच्या संबंधितांनी विद्यार्थी हिताबाबत ठोस उपाययोजना कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांचे भांडण पिक्चर टाईप अन् पोलीसांची सतर्कता 

दरम्यान दोन दिवसापूर्वी दोन वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी ग्रुप बाजी करत एकमेकांवर हल्ला चढवत हाणामारी केल्याची  घटना घडली . यात एका विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आल्याची समजते.या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे पाऊल सतर्कता म्हणून उचलले आहे.घटनेचे मूळ कारण क्लासमध्ये वेगवेगळ्या शाळेतील एकत्रित येणारे विद्यार्थ्यांमधील शाब्दिक चकमक ते मारहाण हे आहे. 

 पालकांनी पाल्यावर ठेवावी काक नजर

पालकांनी शाळेत जाणाऱ्या  आपल्या पाल्यांवर काक नजर ठेवून दक्षता बाळगावी . तो मुलगा असो वा मुलगी, दररोज काय करते, कोणाशी काय बोलते, कोणाशी काय भांडण होते, कोणत्या संगतीच्या मित्रांसोबत राहतात, अभ्यासाची प्रगती काय?  कोणाची काही तक्रार आल्यास  गांभीर्याने घेऊन समजण्याचा प्रयत्न करणे अशा एक ना अनेक बाबींकडे गांभीर्याने लक्ष घालणे अत्यंत गरजेचे आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने