मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची धानोरा येथे अचानक भेट; आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद शाळेच्या कामकाजावर समाधान

 मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची धानोरा येथे अचानक भेट; आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद शाळेच्या कामकाजावर समाधान

चोपडा,दि.१९ ( प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील धानोरा येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी अचानक भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली. या अचानक झालेल्या दौऱ्यामुळे परिसरात विविध चर्चांना  ऊत आला.

सर्वप्रथम त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून आरोग्य सेवा, स्वच्छता, औषधसाठा व रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी ‘निपुण भारत’ अभियानांतर्गत सुरू असलेल्या अध्यापनाची प्रत्यक्ष वर्गात जाऊन पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले तसेच काही प्रश्न विचारून त्यांच्या अध्ययनाची पडताळणी केली. शिक्षकांकडूनही अध्यापन पद्धती व शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली.

दोन्ही ठिकाणच्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत अधिकारी, शिक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. अचानक झालेल्या या भेटीमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत परिसरात चर्चांना उधाण आले असून अधिकारी व कर्मचारी अधिक सतर्क झाल्याचे चित्र दिसून आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने