चोपड्यात दोन पिक अप गाड्यात २३ गोवंश जातीच्या गायी कत्तलीसाठी नेतांना पकडल्या.. पहाटेच्या सुमारास शहर पोलिसांची सुपर कारवाई.३१लाखांचा मुद्देमाल जप्त

 चोपड्यात दोन पिक अप गाड्यात २३ गोवंश जातीच्या गायी कत्तलीसाठी नेतांना पकडल्या.. पहाटेच्या सुमारास शहर पोलिसांची सुपर कारवाई.३१लाखांचा मुद्देमाल जप्त

चोपडा दि.१९(प्रतिनिधी)चोपडा शहर पोलीसांनी धडक कारवाईत पहाटेच्या सुमारास कत्तल करण्याच्या उद्देशाने गाडीत डांबून गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करीत २३ गोवंश जनावरांची सुटका करून दोन पिकअप वाहनांसह एकूण ३१ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही घटना केजीएन कॉलनीत एम आय डी सी भागात घडली.



पोलीस सूत्रांनी कडून प्राप्त माहिती अशी की, १८ जुलै २०२६ रोजी पहाटे ४:०० वाजेच्या सुमारास चोपडा शहरातील के.जी.एन. कॉलनीजवळील एम.आय.डी.सी. परिसरात  पोलिसांना पाहून काही जण पळून गेले. पोलिसांनी तपास केला असता दोन महिंद्रा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाड्या आढळून आल्या. या गाड्यांमध्ये अत्यंत दाटीवाटीने, कोंबून आणि दोरीने बांधून २३ गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याच्या इराद्याने वाहून नेली जात होती.व दोन जनावरे मृत स्थितीत आढळून आली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत उर्वरित २१ जिवंत जनावरांना सुरक्षितपणे गोशाळेत जमा केले आहे.
याप्रकरणी वसीम कुरेशी (रा. मोमीन अली, चोपडा) व  महिंद्रा पिकअप वाहन (क्र. MP 46G 2741) चा अज्ञात चालक३) विना क्रमांकाच्या दुसऱ्या महिंद्रा पिकअप वाहनाचा अज्ञात चालक यांचेवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे 

तसेच प्रत्येकी १० लाख रुपये किमतीच्या दोन महिंद्रा पिकअप गाड्या (एक क्र. MP 46G 2741 आणि एक विना नंबरची). २३ गोवंश जनावरे (बैल व गो-हा) ज्यांची अंदाजे किंमत ११ लाख ७० हजार रुपये आहे. एकूण जप्त मुद्देमालः असा एकुण ३१,७०,०००/- रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल निलेश कैलास वाघ (वय ३३) यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२५, ३२४(४), महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९७६ (२०१५ च्या सुधारणेसह) कलम ५(अ), ५(ब), ९ आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम कलम ११ (१) (घ), (ङ), (च) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन प्रतापराव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संतोष पारधी  हे करीत आहेत.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने