कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येणारे २ गायी जप्त..२ बालक पोलिसांच्या ताब्यात

 कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येणारे २ गायी जप्त..२ बालक पोलिसांच्या ताब्यात 

अडावद,ता.चोपडा दि.१९(प्रतिनिधी)अडावद पोलिसांच्या धडक कारवाईत कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येणारा ४५ हजार रुपयांचा गोवंश जप्त करण्यात आला असून दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  दिनांक १८/०७/२०२६ रोजी रात्री २१:१५ वाजेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे अडावद पोलीस पथकाने शेतकी शाळेच्या पाठीमागे कच्च्या रस्त्यावर सापळा रचून कारवाई केली. कत्तलीच्या हेतूने दोन गायींना क्रूरतेने पायी चालवून घेऊन जाणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.अदमासे रु. ४५,०००/- किंमतीच्या एकूण ०२ गावठी गायी. (जप्त गोवंशाला सुरक्षिततेसाठी तात्काळ कामधेनु गोशाळेत रवाना करण्यात आले आहे

  अडावद पो.स्टे. गुन्हा रजि. नं. ०१४६/२०२६ अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११(१)(c)(d), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम ५ए, ५बी आणि म.पो.का. कलम ११९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपाससपोनि यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल किरण शिरसाठ  हे   करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने