महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ जळगाव जिल्हा अध्यक्षपदी गणेश वंडोळे तर कार्याध्यक्षपदी चोपड्याचे विजय पाटील
चोपडा दि.१८(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची नुकतीच बैठक होऊन जळगाव जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे त्यात जिल्हाध्यक्षपदी गणेश वंडोळे यांची तर जिल्हाकार्याध्यक्षपदी चोपडा येथील विवेकानंद विद्यालयाचे क्रीडाशिक्षक विजय पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड संस्थापक राज्य अध्यक्ष संदीप मनोरे व राज्य सचिव प्रा. तायाप्पा शेंडगे यांनी केली आहे.
जळगाव जिल्हा नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे सौ कांचन विसपुते (जिल्हा उपाध्यक्ष) ,प्रा. खुशाल देशमुख( उपाध्यक्ष ),पंकज वराडे (सचिव ),आकाश धनगर (सहसचिव ),सय्यद अली( सहसचिव ),सागर सोनवणे ( खजिनदार), अमर हटकर (संघटक ),किशोर भोई (संघटक ),विनोद वंडोळे (संघटक ),राकेश धनगर (संघटक) ,सुरेश महाजन (संघटक), प्रमोद धनगर (संघटक), प्रवीण मोरे( प्रसिद्ध प्रमुख ),योगेश शिरसाट (सहप्रसिद्धीप्रमुख), अकबर पठाण (सहप्रसिद्धीप्रमुख), मुकुंद शिरसाट (सदस्य ),प्रशांत सपकाळे (सदस्य), प्रवीण महाजन (सदस्य ),रवींद्र महाजन (सदस्य ),तन्मय गायकवाड )सदस्य)नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
