चोपड्याच्या स्वप्नील पोतदार यांना फिनलँड मध्ये डॅाक्टरेट

 चोपड्याच्या स्वप्नील पोतदार यांना फिनलँड मध्ये डॅाक्टरेट

चोपडा,दि.१८(प्रतिनिधी)- येथील रहिवासी स्वप्नील सुरेश पोतदार यांना जैव माहितीशास्त्र विषयात हेलसिंकी विद्यापीठ, फिनलँड तर्फे पी.एच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी "बायोफॅामेटीक्स टूल्स फॅार ट्रॅफिक स्क्रीनिंग टाटा ॲनेलिसीस" या विषयात आपला प्रबंध सादर केला.

हेलसिंकी विद्यापीठातील डॉ. यानि सारेला, आणि प्रा. क्रिस्टर वेनरबर्ग यांनी या संशोधनासाठी प्रमुख मार्गदर्शन केले तसेच तांपेरे विद्यापीठ फिनलँड येथील प्रा. मात्ती न्यूक्तर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. 

स्वप्नील पोतदार यांनी कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथून प्राणीशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली आणि पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठातील बायोफॅारमेटीक्स सेंटर येथून घेतले. काही वर्षे परसिस्टट सिस्टमस पुणे येथे अनुभव घेतल्यानंतर हेलसिंकी विद्यापीठांतर्गत इन्स्टीट्युट फॅार मोलेक्युलर मेडीसिन, फिनलॅड या संस्थेत बायोफॅारमेटीक्स रिसर्चर या पदावर गेले 14 वर्ष काम करत आहेत. त्यांचे या संशोधनावर आधारित अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.तसेच त्यांना विविध नामांकित शिष्यवृत्ती ही मिळाल्या आहेत. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने