चोपडा तालुक्यात अन्नसुरक्षा विभागाची धाड.. अवैध गुटखा विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा

 चोपडा तालुक्यात अन्नसुरक्षा विभागाची धाड.. अवैध गुटखा विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा

चोपडा दि.११(प्रतिनिधी)शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने दोन दुकांवर  धाड टाकून मानवी आरोग्यास अपायकारक विमल गुटखा, सुगंधित तंबाखू व करमचंद पान मसाला जप्त करून दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात आल्याची घटना घडली.

याबाबत प्राप्त माहिती अन्नसुरक्षा अधिकारी आकाश बोराडे व शहर पोलिसांच्या टीमने संयुक्तिक काही दुकानाची तपासणी केली असता चोपडा शहरातील भाजी मंडईतील रॉयल फ्रुट दुकानाच्या समोरील सार्वजनिक जागेवर फिरोज हुसेन बागवान रा.दर्गाअली, आझाद चौक,हा मानवी आरोग्यास घातक व असुरक्षित  विमल पान मसाला, करमचंद पान मसाला ,तानसेन पान मसाला, व्ही१ सुगंधित तंबाखू असे अवैधरित्या विक्री करताना आढळून आला. तसेच विरवाडा गावातील प्रवीण प्रल्हाद पाटील हा आपल्या मालकीच्या भोलेनाथ पान सेंटर मध्ये अवैधरिता विमल गुटखा विक्री करतांना आढळून आल्याने माल जप्त करण्यात आला असून पोलिस कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान  जळगाव कार्यालयात अन्न सुरक्षा अधिकारी आकाश कैलास बोऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून दोघा आरोपीतांविरुध्द चोपडा शहर पोलिसात अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 मधील कलम 26/2 ,सहवाचता कलम 30 (2) तसेच कलम 26 (2 )(4), 27( 3 )(d), 27 (3 )(e), 3 (2) zz( lV) सहवाचता अन्नसुरक्षा आयुक्तांच्या दिनांक 16 /7/ 2025 रोजी च्या शासन राजपत्र आदेशाचे उल्लंघन केल्याने शिक्षा कलम 59 नुसार गुन्हा केलेला आहे. तसेच भारतीय न्याय संहिता( BNS) नुसार कलम 123 ,275 ,274, 223 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे करीत आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने