कस्तुरबा विद्यालयाचा लोकनृत्य सह भूमिका अभिनय कला प्रकारात जिल्ह्यात प्रथम..! विभागावर निवड..!

 कस्तुरबा विद्यालयाचा लोकनृत्य सह भूमिका अभिनय कला प्रकारात जिल्ह्यात प्रथम..! विभागावर निवड..!

फोटो कॅप्शन -- जळगांव येथे कस्तुरबा विद्यालयाचा यशस्वी संघाचा सन्मान करतांना जिल्हा नोडल अधिकारी डॉ संगीता पाटील,डॉ कविता चव्हाण, श्री शैलेश पाटील,शेजारी एन आर पाटील, श्रीमती एम एन पाटील आदी..

चोपडा,दि.८(प्रतिनिधी) -- राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प , राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय भूमिका अभिनय व लोक नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये चोपडा येथील  कस्तुरबा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संघाने "लोकनृत्य" कला प्रकारात प्रथम क्रमांक तर व "भूमिका अभिनय" कला प्रकारात ही प्रथम क्रमांक प्राप्त करून विभागावर निवड करण्यात आली आहे. 

यावेळी  डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन मराठा अध्यापक विद्यालय जळगाव येथे सदर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.  जिल्हा नोडल अधिकारी तथा अधिव्याख्याता  डॉ संगीता पाटील (महाजन ) यांनी स्पर्धेचे समन्वय केले. तसेच डॉ कविता चव्हाण, श्री शैलेश पाटील,  अधिव्याख्याता यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यालयाच्या यशस्वी  विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून पंकज पाटील, अजय पाटील, कु. हितेशना पवार यांनी काम पाहिले.सदर विद्यार्थ्यांना शिक्षक एन आर पाटील, श्रीमती एम एन पाटील यांनी मार्गदर्शन केले होते. जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष ॲड संदीप पाटील , सचिव डॉ स्मिताताई पाटील,संचालक आदित्य पाटील,मुख्याध्यापक एस एल पाटील  उपमुख्याध्यापक , निरीक्षण समिती सदस्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी कौतुक केले आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने