चोपड्याचा माजी सैनिकाची साडे चार लाखांत फसवणूक.. ♦️"क्युनेट "मार्केटिंग कंपनीत ऑनलाईन पैसे गुंतवल्यास ज्यादा पैशाचे आमिष दाखवत तिघांनी गंडविले

 चोपड्याचा माजी सैनिकाची साडे चार लाखांत फसवणूक..

♦️"क्युनेट "मार्केटिंग कंपनीत ऑनलाईन पैसे गुंतवल्यास ज्यादा पैशाचे आमिष दाखवत तिघांनी गंडविले





चोपडा,दि.१३(प्रतिनिधी) येथील पवार नगरातील माजी सैनिक श्याम चिंतामण वाघ यांना "क्युनेट" नेटवर्क मार्केटिंग कंपनीत पैसे गुंतवल्यास मोठा नफा मिळेल  असे खोटे सांगून साडेचार लाख रुपयात गंडवणाऱ्या तिघाजणांविरुद्ध चोपडा शहर पोलीस शहर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. पैसे वापस देण्यात टाळाटाळ करीत असून उलटजबाबी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी तिघा संशयित भामट्यांनी भरली आहे.

याबाबत याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की चोपडा येथील पवार नगरातील श्याम चिंतावन वाघ (वय 51 वर्ष, सेवानिवृत्त आर्मी कर्मचारी ) यांना जळगाव येथील जिल्हा सैनिक बोर्ड कार्यालयातील तात्पुरता लिपीक पदावर कार्यरत असलेले किशोर महाजन (रा. वाघ नगर जळगाव),रवींद्र बोडके( रा. महाबळ जळगाव) व डॉक्टर प्रज्ञा पाटील( रा.पुणे) या तिघांनी संगणमताने   जुन्या ओळखीचा फायदा घेत 

क्युनेट  नेटवर्क मार्केटिंग कंपनीत पैसे गुंतवल्यास मोठा नफा मिळवण्याचे आमिष दाखवले यावर श्याम वाघ यांनी विश्वास ठेवत स्वतःच्या,  पत्नीच्या व मुलाच्या नावाने ४ लाख 50 हजार रुपये ऑनलाईन भरले पैसे भरले . त्यानंतर त्यांना कोणताही परतावा किंवा फायदा  मिळाला नाही . तसेच मुळ गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळाली नाही.पैसे परत मागितले असता आरोपींनी टाळाटाळ करून फसवणूक केली तसेच चोपडा शहर पोलीस ठाण्यात अर्ज दिला असता आरोपींनी पोलीस स्टेशनच्या बाहेर आपला पैशांच्या विषय लगेच क्लियर करून देऊ असे खोटे आश्वासन दिले व पोलीस स्टेशनच्या बाहेर नेऊन त्यांच्या कुटुंबाला पत्नीला अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की करून फिर्यादीस मारहाण केली तसेच बाहेर शिकणाऱ्या मुलीला पूजा वाघ हिस नुकसान पोहोचवण्याची धमकी दिली. 

याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात श्याम वाघ यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 340/2026 भारतीय न्याय संहिता 296 318(3),115(2),351(2),131(3),(5) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोनि पवन कुमार देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश किशोर हिरे हे करीत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने