शारदा मॅथस परिवाराच्यावतीने जीरायतपाडा शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्याचे वाटप

 शारदा मॅथस परिवाराच्यावतीने जीरायतपाडा शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्याचे वाटप


चोपडा,दि. 13(प्रतिनिधी):  विश्व आदिवासी दिनाचे औचित्य साधून  जिरायतपाडा(ता चोपडा) येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना चोपडा येथील  शारदा मॅथस परिवाराच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 

 शारदा मॅथस्  परिवाराचे संचालक गौरव प्रकाश महाले यांच्या संकल्पनेतून सन २०१८ पासून सुरू असलेल्या शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमांतर्गत जिरायतपाडा शाळेतील  पहिली ते पाचवीच्या सुमारे १५० विद्यार्थ्यांना सुमारे २५०००रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले.

 विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार पाटी, लाकडी पट्टी, पेन्सिल पुडा, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, रंगपेटी, ड्रॉईंग बुक,अंकलिपी, थ्री-इन-वन वही, दुहेरी,एकरेघी व चाररेघी वह्या, कंपास पेटी व रजिस्टर आदी साहित्याचा या किटमध्ये समावेश होता.

या उपक्रमातून जमा झालेल्या निधीतून शारदा मॅथस् परिवारातील विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्य खरेदी करून ते विद्यार्थ्यांना वितरित केले जाते. भविष्यातील सामाजिक जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

यावेळी सरपंच दिलीप शंकर पावरा, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आकाश नारसिंग पावरा उपस्थित होते. मुख्याध्यापक व्ही. जी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यशोमती वाघ, लक्ष्मी महाजन, नम्रता पाटील, मनस्वी पाटील, राधिका पाटील, पुष्कर सोनवणे, यथार्थ पाटील, यश पाटील आणि अनिकेत पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. व शाळेस सरस्वती ची मुर्ती भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद देवरे यांनी केले व आभार शिवाजी आव्हाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षकांनी परिश्रम घेतले......

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने