चोपड्यात धनगर समाजाच्या वतीने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी तहसीलदार दिले निवेदन

 चोपड्यात धनगर समाजाच्या वतीने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी तहसीलदार दिले निवेदन

चोपडा दि.७( प्रतिनिधी) : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षणाच्या अमंलबजावणीसाठी तसेच संत बाळु मामा देवस्थानासाठी स्वतंत्र शासकीय कायदा करून त्या ठिकाणी 21 विश्वस्त नेमुन अध्यक्ष धनगर समाजातील व्यक्तीस देण्यात यावे,पुणे मुंबई महामार्गावरील मिसींग लिंकला स्वातंत्र्यवीर शिग्रोबा धनगर नाव देण्यात यावे, मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकास आहील्यादेवी होळकर नाव देण्यात यावे यासाठी,चोपडा तालुका सकल धनगर समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले यावेळी समाजाच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार योगेश पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले.यावेळी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य मुंबई रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष  प्रवीण सावळे,माजी उपसभापती नंदकिशोर सांगोरे,अनिता शिरसाठ, छाया शिरसाठ,चोसाका संचालक गोपाल धनगर,माजी नगरसेवक महेंद्र धनगर,शाम दाभोळे,आर सी भालेराव, सचिन सांगोरे, ,संदिप धनगर,डॉ अशोक कंखरे,डि एस धनगर,उमेश शिरसाठ, प्रदीप न्हायदे, गणेश सपनार,नवल धनगर परेश धनगर,नंदलाल धनगर,माणिक न्हायदे, प्रफुल्ल नायदेसह तालुक्यातील समाज बांधवांसह महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने