चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली
चोपडा,दि.११ ( प्रतिनिधी )चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा आगारात सुमारे सव्वा तीन वर्षापुर्वी महेंद्र लोटन पाटील यांची छत्रपती संभाजीनगर विभागातुन बदली होऊन चोपडा आगाराचा आगार व्यवस्थापक म्हणून पदभार स्विकारला. पदभार स्वीकारल्या पासुनच कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी कामाची रूपरेषा आखली आणि त्याची फलनिश्चीती म्हणून वडनगरी/शिरपूर येथील शिवपुराण कथेची यशस्वी वाहतुक करून त्यांनी संपूर्ण जिल्हाचे लक्ष वेधुन घेतले होते. त्यांनी शिवपुराण कथा,सप्तश्रृगी यात्रा, पंढरपुर यात्रा, समर्थ सुकनाथ बाबा यात्रोत्सव, चांदणी काळभैरव यात्रा,मनुदेवी,उनपदेव यात्रा यशस्वीपणे व नियोजनबध्द घडविल्या. आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या अथक परिश्रम, कर्मचाऱ्यांच्या मेहनतीच्या जोरावर हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक सन २०२४/२५ अभियानात चोपडा आगाराचा चेहरामोहरा बदलवुन गेल्या वर्षी महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे तर नुकतेच सन २०२५/२६ चे नाशिक प्रादेशिक विभागात द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.त्यांनी कर्मचार्यांना विश्वासात घेवुन आगाराचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करून आगाराचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक टिकवण्यासाठी मेहनत घेतली.त्यांनी चालक, वाहक, यांत्रिक व प्रशासन कर्मचाऱ्यांमध्ये आपला कामाचा ठसा उमटविला. आगारातील कर्मचारी , सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील लोकांच्या सहकार्याने तसेच पत्रकार बांधवांच्या सहकार्याने मी चोपडा आगाराचे नावलौकिक करु शकलो असे निरोप देता वेळी आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.
ते चोपडा आगारात हजर झाल्यानंतर चोपडा आगाराने दोन राज्यस्तरावरील तसेच दोन प्रादेशिक स्तरावरील बक्षीस प्राप्त केली . चोपडा आगार हा सलग तीन बक्षीस मिळवणारा महाराष्ट्रातील एकमेव आगार ठरला आहे.त्यांनी आतापर्यंत एकूण ६५ लाखांचे बक्षीस चोपडा आगारास मिळवून दिले आहेत.
