पोनि पवन देसले यांची "रविवार बैल बाजारात "एन्ट्री

 पोनि पवन देसले यांची "रविवार बैल बाजारात "एन्ट्री

♦️आता न.प.पावती,परवाना तसेच वाहतूक बाबत कागदपत्रे असणे आवश्यक चोपडा शहर पोलिसांकडून आवाहन 

चोपडा दि.२८(प्रतिनिधी): चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन कुमार देसले यांनी रविवारी भरणाऱ्या बैल बाजारात जोरदार एंट्री घेतली असून विना पावती व निर्यदयीपणे गाडीत कोंबून बाजारात बैल आणणाऱ्यांची खैर केली जाणार नाही तसेच कायदा मोडल्यास दंडाचा बडगा उगारला जाईल असा समज देऊन  गुरे बाजारात  आणणाऱ्यांना  नगरपरिषदेची कर आकारणी पावती किंवा परवाना सोबत आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 गुरे वाहतुकीसंदर्भातील नगरपरिषदेची पावती किंवा परवाना मिळवण्यासाठी नगरपरिषदेच्या कर आकारणी विभाग किंवा परवाना विभागाचा गुरे वाहतूक परवाना (Animal Transport Permit) पावती घ्यावी असे स्पष्ट केले आहे.

 *पावती मिळवण्यासाठी करावयाची प्रक्रिया पुढीलप्रमाणे :* १) आवश्यक कागदपत्रे: नगरपरिषदेने दिलेला विहित नमुना अर्ज (सविस्तर माहिती आणि वाहनाचे तपशील).

२)वाहनाची कागदपत्रे: वाहनाचे आर.सी. बुक (RC Book), पीयूसी (PUC) आणि विमा प्रमाणपत्र.

३)प्राण्यांची माहिती: वाहतूक केल्या जाणाऱ्या गुरांची संख्या आणि मालकी हक्काचा पुरावा.

४)चालकाचा परवाना: वाहक आणि चालकाचा वैध परवाना (Driving License).

 प्रक्रिया व पावती:तुमच्या जवळील नगरपरिषदेच्या कार्यालयात (उदा. चोपडा नगरपरिषद किंवा तुमची संबंधित पालिका) जाऊन वरील कागदपत्रे सादर करा.अधिकारी अर्जाची छाननी करून निश्चित केलेले शुल्क (Permit Fees) ठरवतील.नगरपरिषदेच्या काऊंटरवर पैसे भरल्यानंतर तुम्हाला अधिकृत पावती (Receipt) आणि गुरे वाहतूक परवाना दिला जाईल.

वरील कागदपत्रांची वा  पुरावा नसल्यास प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा (Prevention of Cruelty to Animals Act) 

प्राण्यांना क्रूरतेने वागवल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने वाहतूक केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी ₹१० ते ₹५० दंड, तर ३ वर्षांत पुन्हा गुन्हा केल्यास  जेल किंवा दंड (किंवा दोन्ही) होऊ शकतो. याशिवाय नवीन प्रस्तावित कायद्यानुसार ही शिक्षा आणि दंड जास्त कडक करण्यात आला आहे.असेही श्री.देसले यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने