चोपडा आगारातून संभाजीनगर इ बससेवा बंद पडल्याने प्रवाशांत नाराजी

 चोपडा आगारातून संभाजीनगर इ बससेवा बंद पडल्याने प्रवाशांत नाराजी


चोपडा,दि.२५(प्रतिनिधी) - येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातून चोपडा ते छत्रपती संभाजीनगर साठी सोडल्या जाणा-या इ बसेस बंद पडल्याने प्रवाशांत नाराजीचा सुर व्यक्त होत आहे.

चोपडा आगारातून दिवसातून सुमारे सहा फे-या इ बसेस छत्रपती संभाजी नगरसाठी सोडल्यात जात होत्या.त्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळत होता.या गाड्या जळगावकडून जात असल्याने त्याही प्रवाशांची सोय होत होती.तथापि दि.१५ जुन पासून अचानक या फे-या बंद करण्यात आल्या.फे-या बंद करण्याबाबत वरिष्ठांनी स्थानिक अधिका-यांना वा प्रवाश्यांना कोणतीही सुचना दिल्या नाहीत.त्यामुळे प्रवाश्यांत नाराजीचा सुर व्यक्त होत आहे.संभाजीनगरच्या या फे-या पुन्हा एस.टी.प्रशासनाने सुरु कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने