खाकीतून ओसंडला माणुसकीचा झरा.. पंचवीस हजारांची मदत त्वरित दिली होमगार्डला..! ♦️ चोपडयाचे अवलिया पोलिस निरीक्षक पवनकुमार देसले यांचे नेतृत्वात पोलिसांचे दातृत्व

 खाकीतून ओसंडला माणुसकीचा झरा.. पंचवीस हजारांची मदत त्वरित दिली होमगार्डला..!

 ♦️ चोपडयाचे अवलिया पोलिस निरीक्षक पवनकुमार देसले यांचे नेतृत्वात पोलिसांचे दातृत्व 

चोपडा दि.९( प्रतिनिधी):पोलीस दादा म्हटलं की हातात दंडूका व दे दणका अशीच सर्वसामान्यांच्या मनातील प्रतिमा.त्यापुढे गेलं तर खांद्यावरचे स्टार आणि साहेबांचा  दरारा चांगल्या चांगल्याला घाम फोडणारा असतो. त्यातल्या त्यात देणारा कमी आणि घेणारा जास्त अशीच छबी सर्वत्र पाहावयास मिळते.मात्र या सर्व अनुमानांना खोडून काढणारा "अवलिया" पोलिस अधिकारी पवनकुमार देसले यांच्या रूपाने चोपड्याला नव्यानेच लाभले असून माणुसकीचा झराच चोपडेकरांना गवसला आहे.हे म्हणणे वावगे ठरणार नाही.असाच एक दूर्मिळ प्रसंग नुकताच घडला आहे.नुकतेच जनसेवेत मोलाची भूमिका बजावणारे पण गणतीत नसणारा होमगार्ड अधिकारी रवि पाटील यांना कॅन्सर सारखा दूर्धर आजार डिटेक्ट झाल्याने त्यांची पायाखालची वाळू जमीनीवरून सरकली.पण ही मन खिन्न करणारी" रेड न्युज" धाडसी जिगरबाज  पोलिस निरीक्षक पवनकुमार यांच्या कानावर पडल्याने त्यांनी  क्षणाचाही विलंब न करता आपल्या साथीदारांचा तुकडीला एकत्रित पाचारण करीत मदतीची हाक पुकारली.सर्वांनी हात पुढे करत फुल ना पाकळी झोडीत टाकत पंचवीस हजारांचा निधी एक गठ्ठा करून "रवि दादां"च्या हातात सोपविला.अन् परिसरात सर्वांच्याच डोळ्यात आनंदाश्रू तराळले. तुटपुंज्या मानधनावर जनसेवेच व्रत जोपासणाऱ्या बांधवांचा खिसा नेहमीच खाली असतो हे सर्वश्रुत आहे, मात्र या पंचवीस हजाराच्या मदतीने जीवन जगण्याची आशा पल्लवित होण्यास ही मदत लाख मोलाची असल्याचे मत होमगार्ड अधिकारी रवि पाटील यांनी भावना व्यक्त करतांना म्हटले आहे. खरं तर हे अशक्याचे शक्य झाले ते केवळ चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांच्यामुळे ‌.!

चोपडा शहर पोलीस स्टेशनचे होमगार्ड अधिकारी रवींद्र पाटील यांचे चेहऱ्यावर उजव्या बाजूला कॅन्सर डिटेक्ट झाला ते चोपडा शहरामध्ये बऱ्याच वर्षांपासून कर्तव्य बजावत आहेत. त्यांनी गणपती बंदोबस्त व इतर मिरवणूक बंदोबस्त खूप चांगले काम केले आहे.त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला अशी माहिती मिळाल्यावर 

पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी वेळ न दवडता चोपडा शहर तसेच पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचेकडून कॅन्सर ग्रस्त होमगार्ड अधिकारी रवींद्र पाटील यांना विचारपूस करून माणुसकीच्या भावनेतून उपचारासाठी आर्थिक मदत (25,000 रु ) केली.विशेष म्हणजे यावेळी सर्व पोलीस स्टाफ हजर होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने