फेस्काम चे संस्थापक अध्यक्ष कै. डॉ. राधाकृष्ण भट्ट जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन
चोपडा दि.१०(प्रतिनिधी)ज्येष्ठ नागरिक संघात दिनांक ९/७/२०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजता फेस्काम चे संस्थापक अध्यक्ष कै. डॉ. राधाकृष्ण भट्ट जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्रतिमा अकुलखेडे लक्ष्मीनारायण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. अरविंद महाजन यांचे हस्ते पूजन केले व संघाचे स्विकृत व जेष्ठ सदस्य श्री. रमेश शिंदे ताथ्या यांचे हस्ते माल्यार्यपन करुन संघाचे अध्यक्ष श्री जयदेव देशमुख यांनी पूजन केले.
तसेच संघाचे सचिव श्री. विलास पं. पाटील यांनी डॉ. कै. राधाकृष्ण भट्ट यांचे जेष्ठ नागरिक यांनी १२ डिसेंबर १९८० स्थापना करुन त्याचे महान कार्या बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास संघाचे उपाध्यक्ष श्री नेरपगारे आबा ,सहसचिव श्री. विलास सु. पाटील माजी.सचिव श्री.एन डी. महाजन सर, संचालक श्री राजेंद्र साळुंखे , सभासद श्री. एस. एच. पाटील सर, प्रा. एस. के. पाटील प्रा. एस. एम्. पाटील श्री. गोकूळ पाटील, श्री भालचंद्र साळुंखे, कोषाध्यक्ष श्री. विजय देवांग सर, श्री. एल. पी. पाटील, परशुराम पेंढारकर , शांताराम नाना प्रकाश चौधरी, रामकृष्ण माळी श्री. ज्ञानेश्वर पाटील , श्री. संजय बजाज , श्री विनय पाठक असे हजर होते.
