तिसरीत शिकणाऱ्या अदीती ची लाल दिव्याच्या गाडीत फिरवण्याची ईच्छा ..तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी केलीपूर्ण

 तिसरीत शिकणाऱ्या अदीती ची लाल दिव्याच्या गाडीत फिरवण्याची ईच्छा ..तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी  केलीपूर्ण 

 चोपडा,दि.१०(प्रतिनिधी):- तहसीलदार भाऊसाहेब थोरात हे लासुर येथे बीएलोच्या आढावा बैठकीसाठी गेले असता गावातील  जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेला अचानक भेट दिली.विद्यार्थ्यांमध्ये मोठे साहेब आलेत म्हणून आनंदाचे वातावरण निर्माण झाले.त्यांनी इयत्ता तिसरी च्या वर्गात जाऊन चिमुकल्या विद्यार्थिनींसोबत संवाद साधत असतांना एका विद्द्यार्थिनीला प्रश्न विचारले की तुझे नाव काय? त्यावर तिने मोठ्या उत्साहात स्वतःचे नाव सांगितले त्यानंतर त्या विद्द्यार्थिनीला विचारले की बेटा तुला भविष्यात काय व्हायचं आहे तिने सांगितले मला पी.एस.आय व्हायचं आहे. एवढे ऐकून तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी आनंद व्यक्त करीत  पुढच्या बैठकीसाठी रवाना झालेत.मात्र अदिती प्रवीण माळी या चिमुकली चे उत्तर ऐकून साहेबांचे मन भरून आले.तहसीलदार यांनी बैठक आटोपून पुन्हा त्या चिमुकल्या आदिती च्या वर्गाकडे जाऊन त्या विद्द्यार्थिनीला बोलावले आणि स्वतः तिला सरकारी लाल दिव्याच्या गाडीत ड्राइवरच्या बाजूला बसविले आणि ड्रायव्हर ला सांगून एक राऊंड फिरवायला सांगितले. हा सर्व प्रकार बघून चिमुकलीचा आनंद गगनात मावेनासा झाला.तहसीलदार थोरात आणि ती विद्यार्थीनी आणि तेथील शिक्षक गावातील नागरिक तो क्षण बघून भारावून गेलेत. तहसीलदार थोरात यांचा विद्यार्थीप्रिय स्वभाव आणि भविष्यातील होणारी अधिकारी म्हणून त्या चिमुकल्या विद्यार्थीनिचे स्वप्न  साहेबांनी तात्पुररते का असेना पण पूर्ण केले. आजच लाल दिव्याच्या गाडीतली मोठी साहेब झाली अशी जाणीव तिला तहसीलदार थोरातांनी करून दिली.ते पाहून शाळेतल्या तिच्या शिक्षिकांना खूप आनंद झाला.यावेळी महसूल अधिकारी मंडळ अधिकारी आणि लासूरचे तलाठी भूषण पाटील  ग्रामसेवक देवरे लासूर चे पत्रकार  अरुण पालिवाल ,श्रीकांत पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते गोपाल पाटील उपस्थित होते.तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या या कृतीबद्दल लासुर गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.सर्वच लासुर परिसरात त्या विदयार्थीनिचे कौतुक व अभिनंदन होतेय.दिवसभर गावात याच गोष्टींची चर्चा सुरू होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने