"जळगाव तालुका पोलिसांची धडक कारवाई; १० गुन्ह्यांची उकल, ०५ अट्टल आरोपी जेरबंद, ४ लाखांचा वर मुद्देमाल हस्तगत"
जळगाव दि.११(प्रतिनिधी): जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बंद घरे हेरून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरी करणारी टोळी पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत होती. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना गुन्ह्यांचा तातडीने छडा लावण्याबाबत मार्गदर्शन करून आवश्यक सूचना दिल्या.त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी आपल्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदारांची स्वतंत्र पथके तयार करून गुप्त माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच संशयितांवर सतत पाळत ठेवण्याच्या सूचना दिल्या .दरम्यान, जळगाव तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र.६७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक विश्लेषणातून अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली. प्राप्त माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तात्काळ सापळा रचत आरोपीत नामे १) गुरुजीत सिंग सुजानसिंग बावरी वय २६, रा. शिरसोली नाका, तांबापुरा, जळगाव (टोळीचा मुख्य म्होरक्या) २) दीपक बापू पाटील वय २३, रा. पंचशील नगर, तांबापुरा, जळगाव ३) राजेश माणिक राठोड वय २४, रा. तांबापुरा, जळगाव) ४) सुमित संजय कोळी वय १९, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव ५) महेश उर्फ संतोष भोई वय २४ रा. तांबापुरा, जळगाव या पाच अट्टल आरोपींना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांन कडुन सखोल आणि कसून चौकशी केली असता, त्यांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत एकुण १० गुन्हे त्यांत ०९ घरफोडी (House Breaking Theft) तसेच ०१ मोटर वाहन चोरी गुन्हयांची केल्याची कबुली दिली
उघडकीस आलेल्या गुन्हयांतील पुढील प्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.तो असा
१) २,३०,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल घरफोडीच्या गुन्ह्यांमधील
२) २,००,०००/- रु किंमतीच्या एकुण ०४ मोटार सायकल
असा एकुण ४,३०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मुख्य आरोपी गुरुजीतसिंग बावरी सराईत गुन्हेगार
यातील मुख्य आरोपी गुरुजीतसिंग बावरी हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द एमआयडीसी (MIDC) पोलीस स्टेशनः ११ गुन्हे, जिल्हा पेठ पोलीस स्टेशनः ०१ गुन्हा तसेच जळगाव तालुका पोलीस स्टेशनः ०१ गुन्हा असे तब्बल १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत.तपासादरम्यान असेही निष्पन्न झाले की, आरोपीविरुद्ध यापूर्वी महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (MPDA) अंतर्गत कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यास एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. कारागृहातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा घरफोडीचे सत्र सुरू केले होते. मात्र, जळगाव तालुका पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून संपूर्ण टोळीला जेरबंद करत नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे.
यांनी केली धडक कारवाई
सदरची कामगिरी श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, जळगाव, श्री. संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, श्री नितीण गणापुरे, उप विभागीय पोलीस अधिकारी जळगांव विभाग यांचे मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, प्रोफेशनरी पोलीस उपनिरीक्षक यज्ञजीता येडले पोहेकॉ प्रदीप राजपूत तसेच गुन्हे शोध पथकाचे (DB Team) पोलीस हवालदार अविनाश देवरे, योगेश पाटील, नरेंद्र पाटील, श्रीकांत बदर, पोलीस नाईक कैलास इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर, शरद पाटील, दिपक देवरे आणि वाहन चालक पोलीस हवालदार अशोक पाटील व पंकज देशमुख या पथकाने उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे
