चोपडा दि.११(प्रतिनिधी)महेश किरण सोनवणे भारतीय नौदलातील जवानाचा प्रताप विद्या मंदिरात यथोचित सत्कार करण्यात आला . प्रताप विद्या मंदिराचा 2017/18 चा इ10 वीचा माजी विद्यार्थी महेश किरण सोनवणे हा सध्या भारतीय नौदलात अंदमान निकोबार येथे कार्यरत आहे . संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर यांच्या हस्ते त्याचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यास पेढा भरवून ,शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू प्रदान केले .
याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एम डब्ल्यू पाटील ,उपमुख्याध्यापक श्री ए एन भट, उपप्राचार्य श्री जे एस शेलार, पर्यवेक्षक श्री एस व्ही करमरकर व श्री पंकज नागपुरे व समन्वयक श्री गोविंद गुजराथी व शिक्षक वृंद उपस्थित होते .
चि महेश सोनवणे याने आपल्या शिक्षणात व प्रगतीत प्रताप विद्या मंदिराचा वाटा असल्याबाबत आवर्जून नमूद केले .अनौपचारिक गप्पांमध्ये त्याने त्याच्या ड्युटी तील काही रोमांचक गोष्टी सांगत गलवाडे सारख्या ग्रामीण भागातून पुढे गेल्याचा आनंद व्यक्त करीत प्रताप विद्या मंदिराचे ऋण मानले . शाळेतील रम्य आठवणीना उजाळा दिला. ताईसाहेबांनी त्याच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या . प्रताप विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांसमोर गेल्या कित्येक वर्षानंतर भारतीय नौदलात जाणारा विद्यार्थी म्हणून चौकशी केली . त्याच्या मार्फत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी व अधिकाअधिक विद्यार्थी मातृसेवेसाठी लष्करात दाखल व्हावे असे मत व्यक्त केले .
