प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भाषा विशेष प्रशिक्षकांचे मार्गदर्शन

 प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भाषा विशेष प्रशिक्षकांचे मार्गदर्शन 


चोपडा,दि.११(प्रतिनिधी) :  एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा येथे दि. 10 जुलै रोजी नवनीत प्रकाशन यांच्यामार्फत  भाषा विशेष प्रशिक्षकांचे प्रशिक्षण सत्र (सहज शिकू या) उत्साहात पार पडले. या प्रशिक्षणात मा. श्री. सुजितकुमार सोनकर सर यांनी सकाळी 9.00 ते 11.00 या वेळेत शिक्षकांना प्रभावी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणामध्ये विविध अध्यापन पद्धतींचा योग्य वापर, बोलण्यात अडचण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त कृती, विविध शैक्षणिक ॲक्टिव्हिटी प्रभावीपणे कशा घ्याव्यात, विद्यार्थ्यांच्या विचारांना स्वातंत्र्य देऊन त्यांची मते समजून घेणे, विद्यार्थी व पालकांशी प्रभावी संवाद कसा साधावा, विद्यार्थ्यांच्या लहान-लहान चुका सकारात्मक पद्धतीने सुधारण्याच्या तंत्रांसह नाट्य, मुलाखत व रचनात्मक कौशल्यांचा अध्यापनात प्रभावी वापर या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना भाषा अध्यापन अधिक प्रभावी, विद्यार्थी-केंद्रित व कृतीशील पद्धतीने करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळाले. या प्रशिक्षणाच्या वेळी चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक मा. श्री.रजीश बालन सर, संस्थेचे समन्वयक मा. गोविंद सर, उपमुख्याध्यापिका मा. सौ.निखिला मॅडम उपस्थित होते.तसेच सूत्रसंचालन शाळेच्या उपशिक्षिका सौ. वैशाली माळी मॅडम तसेच आभार प्रदर्शन सौ.मनीषा वानखेडे मॅडम यांनी केले. प्रशिक्षणात  पूर्व प्राथमिक,प्राथमिक, माध्यमिक विभागात शिकवणाऱ्या मराठी व हिंदी शिक्षिका उपस्थित होत्या. उपस्थित शिक्षकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेत मार्गदर्शकांचे आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने