ज्ञानेश यात्रा परिवाराची "चारधाम यात्रा" सुखद व प्रेमदायी

 ज्ञानेश यात्रा परिवाराची "चारधाम यात्रा" सुखद व प्रेमदायी 

    चोपडा दि.११(प्रतिनिधी): जळगाव येथील ज्ञानेश यात्रा परिवाराच्या अध्यक्षा  सौ चंद्रकला मराठे व प्रमुख अतिथी  श्री गोरख महाराज यांनी वाजवी    दरात चारधाम यात्रा दर्शनाचा मनस्वी विडा उचलला असून अत्यंत प्रेमदायी व घरपण देणारी यात्रा कंपनी असून चारधाम चे दर्शन करताना  आप्त स्वकीयांचा सहवास सोबत लाभल्यागत अनुभव  पाहायला  मिळाल्याची भावना 57 सहप्रवासींच्या मुखातून ऐकावयास मिळाली.

     ईश्वराच्या कृपेने यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या पवित्र चारधामांची यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. चारधाम यात्रा ही केवळ पर्यटन नसून श्रद्धा, संयम, सेवा, त्याग आणि आत्मचिंतनाची एक महान साधना आहे. उंच पर्वत, कठीण रस्ते, बदलते हवामान आणि अनेक आव्हाने यांवर मात करत  सर्वांनी श्रद्धेच्या बळावर ही यात्रा पूर्ण केली. हा अनुभव आयुष्यभर  मनात कायम राहील.अशी प्रतिक्रिया सुनील चौधरी (चोपडा) यांनी सर्व यात्रेकरू जमलेले असतांना सामुहिक संवाद साधताना व्यक्त केली.या यात्रेत प्रत्येक यात्रेकरूने एकमेकांना दिलेली साथ, प्रेम आणि सहकार्य हेच या यात्रेचे खरे वैशिष्ट्य होते. आपुलकी आणि आध्यात्मिक नाते जपण्याचा सुखद अनुभव प्रवाशांना आला.

यात्रेचे यशस्वी आयोजन करणारे आयोजक श्री गोरख महाराज  व गजानन महाराज, मार्गदर्शक, वाहनचालक, स्वयंसेवक, वैद्यकीय मदतनीस आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य  करणाऱ्या  या सर्वच व्यक्तींमधून समर्पणाची भावना यात्रेकरूंना पाहावयास मिळाली.

   भगवान केदारनाथांचे आशीर्वाद, भगवान बद्रीनाथांची कृपा, माता गंगेचे पावित्र्य आणि माता यमुनेची मंगलमय कृपा  सर्वांच्या जीवनात सदैव राहो.तसेच  सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, शांती, समृद्धी आणि सद्बुद्धी लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना यावेळी यात्रेकरूंनी केली.या संवाद मेळ्यात सूत्रसंचलन श्री सुनिल चौधरी तर आभार प्रदर्शनाची भूमिका श्री देवामामा कुलकर्णी यांनी पार पाडली .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने