अतिक्रमण धारक टपरीधारकांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.. चोपडा नगरपरिषदेच्या बाजूने निकाल

 अतिक्रमण धारक टपरीधारकांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.. चोपडा नगरपरिषदेच्या बाजूने निकाल 

चोपडा,दि.७(प्रतिनिधी) नगरपालिकेने काढलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात चोपडा बस स्थानकासमोरील आणि चोपडा बस स्थानकांच्या उत्तर बाजूकडील  टपरी धारक न्यायालयात गेले होते त्यावर सुनावणी होऊन चोपडा न्यायाधीशांनी टपरी अतिक्रमण धारक यांचा मनाई हुकूम मिळाल्याचा अर्ज फेटाळून लावत नगर परिषदेने च्या बाजूने निकाल दिला आहे.

काही दिवसापूर्वी नगरपालिकेने अतिक्रमण धारकांविरुद्ध जोरदार मोहीम उघडत शहराचे रस्ते मोकळे करण्याचे काम हाती घेतले होते या कारवाई विरोधात काही अतिक्रमण धारक टपरी चालकांनी एकत्रित येत चोपडा न्यायालयात धाव घेत स्टे अर्ज दिला होता त्यावर दिनांक ७/७ २०२६ रोजी दोन्ही पक्षांचे बाजू ऐकून घेत न्यायाधीशांनी अतिक्रमणधारक टपरीधारकांच्या मनाई हुकूम मिळेसाठीचा अर्ज फेटाळून लावत नगरपालिकेच्या बाजूने निकाल दिला आहे याप्रसंगी दोन्ही पक्षाचे वकील हजर होते. 

दरम्यान शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी अतिक्रमणाविरुद्ध नगरपालिकेने प्रथमच जोरदार पाऊल उचलत कारवाईचा बडगा उगारला होता त्यामुळे या  कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांनी जोरदार स्वागतही केले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने