चोपडा ज्येष्ठ नागरिक संघ कार्यकारिणी बिनविरोध - ५ नवीन स्वीकृत सदस्य

 चोपडा ज्येष्ठ नागरिक संघ कार्यकारिणी बिनविरोध - ५ नवीन स्वीकृत सदस्य 

  चोपडा,दि.८(प्रतिनिधी)शहरातील विठ्ठल मंदिर समोर नारायण वाडीत चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या कै . मगन लाल रामदास बडगुजर (साळुंखे ) सभागृहात नुकतीच संघाची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभाउत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली .

सभेच्या प्रारंभी देशभरातील विविध क्षेत्रातील दिवंगतमान्यवर तसेच संघ सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . 'खरा तो एकची धर्म ' प्रार्थनेने वार्षिक सभेस प्रारंभ झाला . प्रारंभी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजनअध्यक्ष जयदेव देशमुख यांनी केले कोषाध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी गतवर्षाच्या कालावधीत झालेला जमा खर्च सभे पुढे मांडला . तर वर्षभर राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा वजा अहवाल स्वरूप वाचन श्री .जयदेव देशमुख यांनी केले .तसेच वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचन - सूत्रसंचालन सचिव निवृत्त मुख्या .विलास पी .पाटील सर यांनी केले .

विषय पत्रिकेतील विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात साधक बाधक चर्चा झाल्यानंतर ,संघ पदाधिकारी व कार्यकारिणीचा २ वर्षांचा कालखंड पूर्ण झाल्यामुळे २०२६ ते २०२८ साठी पदाधिकाऱ्यांसह  कार्यकारिणी निवडीचा मुख्य विषय वार्षिक सभे पुढे आला .

तेव्हा गतवर्षी राज्यातील ग्रामीण भागात काम करणारा सर्वोत्कृष्ठ संघ म्हणून चोपडा ज्येष्ठ नागरिक संघास राज्यपुरस्कार मिळाला आहे, यास्तव जुने पदाधिकारी व कार्यकारिणी यांनाच पुन्हा २ वर्षांसाठी संधी देण्यात यावी असे वार्षिक सभेत सर्वानुमते ठरले . सोबतच वार्षिक सर्वसाधारण सभेने विषय चर्चेत कार्य .सदस्य प्रा .श्यामभाई गुजराती यांनी उदाहरणांदाखल घेतलेल्या नावांतील ५ स्वीकृत सदस्यांची संघाच्या सुकाणू समितीने निवड करावी असे सर्वानुमते ठरले . 

यावेळी संघाचे माजी अध्यक्ष श्री . विजय करोडपती, संघ कार्यकारिणीतील ज्येष्ठ सदस्य माजी नगराध्यक्ष रमणलाल गुजराथी, प्रा .श्याम गुजराथी, एम .डब्ल्यू .पाटील ,गोविंदा महाजन, जे .एस . नेरपगारे, राजेंद्र साळुंखे, शंकुतला गुजराथी,विलास एस . पाटील, ॲड . व्ही .बी . पाटील, विलास पी .पाटील सर हे कार्यकारिणी पदाधिकारी - संचालक तसेच मधुकर बाविस्कर, प्रमोद डोंगरे, एन. डी . महाजन, सुभाष गुरुजी, रमेश शिंदे तात्या, प्रा .अलिझाड सर,आर .एच .बाविस्कर, भीमराव देशमुख,,प्रा .आर .जी .पाटील, अजबराव पाटील ,प्रा .एस . एम् .पाटील, भगवान देशमुख,पत्रकार अनिल पालिवाल, यशवंत जडे, राजेंद्र देशमुख,अरुण पाटील सर, गोकूळ पाटील, संजय बजाज , प्रमोद अहिरराव ,सौ .ताराबाई पाटील, नलिनी बारोट - देशमुख, निर्मला पाटील या संह अनेक ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी उपास्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने