प्रताप ज्युनिअर कॉलेजचा माजी विद्यार्थी रोशन वाघ याची NIPER परीक्षेत गरूडझेप
चोपडा,दि.४(प्रतिनिधी)येथील प्रताप विद्यालयाचा सन २०२२च्या बॅचचा जुनिअर कॉलेजचा विद्यार्थी रोशन विजय वाघ याने NIPER M.S./M.Tech./MBA प्रवेश परीक्षा २०२६ हैदराबाद येथे प्रवेश मिळवला आहे.त्याने आतापर्यंत अनेक प्रतिष्ठित राष्ट्रीय-स्तरीय स्पर्धा परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केल्या आहेत.त्याच्या यशस्वीतेचे प्राध्यापकांसह संस्था चालकांनी कौतुक केले आहे.
रोशन वाघ याने AIR १०३७ (कॅटेगरी रँक: AIR ५१),तरGPAT २०२६ – AIR १०६६,GPAT २०२५ – उत्तीर्ण,GATE २०२६ – उत्तीर्ण ICT M.Tech प्रवेश परीक्षा – उत्तीर्ण,CUET-PG (Life Sciences & Pharmacy) – उत्तीर्ण केले आहे अशी यशस्वी शैक्षणिक वाटचाल करीत आहे.तसेच नुकतेच आर. सी. पटेल कॉलेज, शिरपूर येथून 'बॅचलर ऑफ फार्मसी' (B.Pharm.) चे शिक्षण पूर्ण केले आहे.
NIPER म्हणजे काय:
'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च' (NIPER) ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त संस्था असून, औषधनिर्माण क्षेत्रातील शिक्षण आणि संशोधनासाठी ती देशातील प्रमुख संस्थांपैकी एक आहे. भारतात NIPER ची सात परिसरे (कॅम्पसेस) आहेत: मोहाली, अहमदाबाद, गुवाहाटी, हैदराबाद, हाजीपूर, कोलकाता आणि रायबरेली.
फार्मास्युटिकल मॅनेजमेंट'मध्ये MBA करण्यासाठी त्याने भारतातील सर्वोत्तम NIPER परिसरांपैकी एक असलेल्या 'NIPER हैदराबाद'मध्ये प्रवेश मिळवला आहे. त्याचे यशाबद्दल सर्वत्र त्याचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
