नव्या विकास आराखड्यात चर्चा..! चोपडयापर्यंत होणार सहापदरी द्रुतगती महामार्ग ? ♦️छत्रपती संभाजीनगर, जळगाव, चोपडा असा राहणार मार्ग.. कृषी क्षेत्रातील लघु व मध्यम उद्योगांना होणार फायदा..!

 

नव्या विकास आराखड्यात चर्चा..! चोपडयापर्यंत होणार  सहापदरी द्रुतगती महामार्ग ?
♦️छत्रपती संभाजीनगर, जळगाव, चोपडा असा राहणार मार्ग.. कृषी क्षेत्रातील लघु व मध्यम उद्योजकांना होणार फायदा..!

चोपडा,दि.१८(प्रतिनिधी):  उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील "चोपडा" हे कृषी व व्यापार क्षेत्रात अग्रगण्य असल्याने बाजारपेठेच्या व्यापाराकरिता जळगाव ते छत्रपती संभाजी नगर शिघ्र संचार द्रूतगती महामार्गाला जोडण्याची हालचाल सुरू आहे. या भागात केळी, ऊस, कापूस ,मका व डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होतअसते तसेच   ब्रऱ्हानपूर- अंकलेश्वर गुजरात मार्ग औद्योगिक व व्यापारी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे या शहराला हा सहा पदरी महामार्ग जोडल्याने औद्योगिक गुंतवणुकीसाठी नवीन संधी निर्माण होऊन लघु व मध्यम उद्योगांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्या अनुषंगाने त्या महामार्गाचे सर्वेक्षण पूर्ण होऊन पुढील हालचाली गतिमान झाल्या आहेत तसेच चोपडा तालुक्यातील हा मार्ग महामार्ग जोडावा अशी मागणी बऱ्याच कालावधीपासून जोर धरून असल्याने हा महामार्ग चोपडयाला जोडला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक आणि कृषी विकासाला नवी दिशा देणाऱ्या जळगाव ते छत्रपती संभाजीनगर शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाचे सर्वेक्षण पूर्ण होऊन पुढील हालचाली गतिमान झाल्या आहेत. दरम्यान, धरणगाव तालुक्यापासून प्रस्तावित असलेला हा सहापदरी द्रुतगती महामार्ग थेट चोपडा तालुक्याला जोडण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे. यामुळे विशेषतः खान्देशच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास शेतकरी वर्गासह व्यापारी आणि उद्योग क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.
खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे तीन जिल्हे कृषी उत्पादनासाठी देशभर ओळखले जातात. केळी, ऊस, कापूस, मका, डाळी आणि इतर नगदी पिकांच्या उत्पादनात या भागाचे महत्त्वाचे योगदान आहे. मात्र, दर्जेदार आणि जलद वाहतूक सुविधांच्या अभावामुळे अनेकदा शेतमाल बाजारपेठांपर्यंत पोहोचविताना अतिरिक्त खर्च आणि वेळेचा सामना करावा लागतो. त्यामुळे जळगाव-छत्रपती संभाजीनगर शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाचा विस्तार चोपडा तालुक्यापर्यंत करण्याची मागणी अधिक जोर धरत आहे. चोपडा हे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे कृषी आणि व्यापारी केंद्र मानले जाते. या शहराला द्रुतगती महामार्गाची थेट जोडणी मिळाल्यास जळगावमार्गे छत्रपती संभाजीनगर, नागपूर, मुंबई तसेच राज्यातील इतर प्रमुख बाजारपेठांशी संपर्क अधिक वेगवान होईल. परिणामी शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च कमी होऊन त्यांना बाजारभावाचा अधिक लाभ मिळू शकतो. तसेच कृषी प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊसिंग आणि लॉजिस्टिक क्षेत्रालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
मालवाहतूक अधिक गतिमान
याशिवाय बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाशी चोपडा शहराची जोडणी हा देखील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय मानला जात आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर आणि गुजरातमधील अंकलेश्वर यांना जोडणारा हा मार्ग औद्योगिक तसेच व्यापारी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. विशेषतः अंकलेश्वर हे देशातील प्रमुख रसायन आणि उत्पादन उद्योगांचे केंद्र असल्याने या मार्गाला राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व प्राप्त झाले आहे. चोपडा शहर द्रुतगती महामार्गाशी थेट जोडले गेल्यास खान्देश, गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्यातील व्यापार अधिक गतिमान होऊ शकतो. औद्योगिक गुंतवणुकीसाठी नवीन संधी निर्माण होण्याबरोबरच लघु व मध्यम उद्योगांना बाजारपेठ उपलब्ध होईल. सध्या ग्रामीण आणि अंतर्गत रस्त्यांवरून होणारी मालवाहतूक द्रुतगती महामार्गाशी जोडली गेल्यास वाहतुकीचा कालावधी कमी होईल आणि खर्चातही बचत होईल. याचा थेट फायदा उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राला होऊ शकणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने