कोळी महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन
चोपडा दि.१८(प्रतिनिधी) : कोळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार श्री रमेश दादा पाटील यांच्या नेतृत्वात व युवा प्रदेश अध्यक्ष अँड चेतन दादा पाटील यांच्या मार्गदर्शनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारींना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले आंदोलन टोकरे कोळी जमातीच्या प्रश्नांसंदर्भात तात्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि २०/१०/२०२३ रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने अंमलबजावणी होणे अपेक्षित होती परंतु महाराष्ट्र राज्यातील विधानसभा, नगरपरिषद महानगरपालिका जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे महाराष्ट्र शासनाकडून आदिवासी टोकरे कोळी समाजाचे परिपत्रक काढण्यास दिऱंगाई झाल्याने समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे समाजाची भावना व कोळी महासंघाने केलेल्या पाठपुरावाच्या अनुषंगाने आपणास या स्मरण पत्राद्वारे पुन्हा एकदा विनंती करण्यात येत आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील बांधवांचे जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ रित्या मिळणे व रक्त नात्यातील समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याबाबत आपण दि २०/१०/२०२३ रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने व इतिवृत्त प्रमाणे आपण त्वरित परिपत्रक काढण्याकरिता माननिय मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवावे तसेच जळगाव जिल्ह्यात अनुसूचित जमाती (एस टी) प्रमाणपत्र तपासणी समितीचे कार्यरत कार्यालय पुर्ण क्षमतेने तात्काळ पूर्ण वेळ सुरू करण्यात यावे तसेच ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक वर्ष मुदत वाढ मिळावी असे लेखी निवेदन आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्यव्यापी एकदिवसीय धरणे आंदोलन करून जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले .
यावेळी आदिवासी टोकरे कोळी समन्वय समिती जळगाव जिल्हा अध्यक्ष जितेंद्र सोनवणे ,कोळी महासंघ जेष्ठ नेते बाळासाहेब सैंदाणे कायदेशीर सल्लागार अँड अमित सोनवणे, जिल्हाध्यक्ष हरिलाल कोळी, मुकेश सोनवणे, संपर्क प्रमुख सुभाष सोनवणे टोकरे कोळी आंदोलनकर्ते प्रल्हाद सोनवणे, युवा अध्यक्ष संदीप कोळी, नितीन कांडेलकर, नगरसेवक किशोर बाविस्कर, दिपक तायडे ,नारायण कोळी, व्हि टी सोनवणे, संतोष कोळी, रामचंद्र कोळी, मंगलाताई सोनवणे, मंदाताई सोनवणे ,रत्नाताई बागुल ,सुमनताई मराठे, योगेश बाविस्कर, गुलाब बाविस्कर ,गजानन सोनवणे ,आकाश कोळी, रघुनाथ कोळी ,देविदास कोळी, विजय बाविस्कर ,खेमचंद कोळी, विशाल सपकाळे ,भाईदास कोळी ,पितांबर कोळी, महेश कोळी ,रोहन सोनवणे, किरण तायडे, पांडुरंग सोनवणे यांच्या सह कोळी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
