सार्वजनिक प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अडावद येथे नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
अडावद ता 18(प्रतिनिधी) येथील अडावद परिसर शिक्षण मंडळ संचलित सार्वजनिक प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इयत्ता १ ली, व ५ वी त प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे हर्ष पूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार जगदीशराव देशमुख हे होते.सर्वप्रथम माता सरस्वतीचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
नवीन विद्यार्थ्यांचा स्वागतासाठी शालेय परिसर फुगे आणि रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता.विद्यार्थ्यांचे आगमन होताच सन्माननीय संचालक मंडळ व मुख्याध्यापकांसोबत संपूर्ण स्टाफ ने विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव केला.त्या नंतर विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.तसेच सेल्फी पॉईंट हा देखील विद्यार्थ्यांसाठी नवीन आकर्षण ठरला.शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ मध्ये इयत्ता १० वीत ८४.२० % गुण मिळवून प्रथम आलेल्या सायली प्रवीण महाजन हिचा पालकांसमवेत सत्कार करण्यात आला.त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या जॉ. सेक्रेटरी ताईसो. मीनाताई देशमुख,उपाध्यक्ष रतीलाल महाजन,मुख्याध्यापक श्री. कदम यांनी मार्गदर्शन केले.शाळेतील पोषण आहारासोबतच विद्यार्थ्यांना गोड मिष्टान्न देण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. नंदकुमार देशमुख, उपाध्यक्ष रतीलाल महाजन,जॉ. सेक्रेटरी मीनाताई देशमुख,संचालक मंडळातील . शांताराम कोळी,.मधुकर देशमुख,. मनोजकुमार देशमुख,. हरीश पाटील तसेच प्रा. व माध्य. विभागाचे मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते.सूत्रसंचालन . सचिन पाटील केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री. कदम मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले
