प्रा.आ.केंद्र.लासूर येथे "पल्स पोलिओ" मोहीम पूर्व प्रशिक्षण तथा स्टॉप डायरिया कॅम्पेन" कार्यशाळा
चोपडा दि.१८(प्रतिनिधी): प्राथमिक आरोग्य केंद्र-लासूर, ता.चोपडा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकार डॉ.प्रमोद सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गिरीश गोसावी यांच्या सूचनेनुसार व वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका तांबे, वैद्यकीय अधिकारी डॉ.मानसी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील, तालुका आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख व तालुका हिवताप पर्यवेक्षक-जगदीश बाविस्कर यांनी कार्यशाळेला उपस्थिती देऊन, उपस्थित सर्व आरोग्य कर्मचारी वर्ग, गट प्रवर्तक,आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांना राज्यभर आणि आपल्या जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व सरकारी दवाखान्यात पुढील आठवड्यात होऊ घातलेले विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ही दिनांक २८ जुन २०२६ रविवार रोजी राबविण्यात येणार आहे, तसेच,
बालकांमधील कुपोषण व कुपोषणामुळे होणारे मृत्यू थांबवण्यासाठी देखील दिनांक १जून २०२६ पासून "स्टॉप डायरिया" या नावाने विशेष मोहिम राबविली जात असून,
उपरोक्त विषयांना अनुसरून भागातील सर्व आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांना पल्स पोलिओ मोहिमेबाबत पूर् प्रशिक्षण तथा डायरिया या आजाराविषयी सखोल माहिती देऊन सम्पूर्ण शंकेचे निरसन करून, या आजाराचा उद्भव, त्याची लक्षणे व उपाययोजना बाबत मार्गदर्शन करून या मोहिमेचे महत्व पटवून दिले व मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.
तसेच तालुका हिवताप-पर्येंवेक्षक बाविस्कर यांनी आणि तालुका आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्याचे व प्रा.आ.केंद्राचे दप्तर तपासणी व सर्वांना मार्गदर्शन करून कामाविषयी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी लासुर प्रा.आ.केंद्राचे-वैद्यकीय अधिकारी-डॉ.प्रियंका तांबे, वैद्यकीय, डॉ.मानसी पाटील, आ. सहाय्यिका-श्रीमती लता अलकारी सिस्टर, आ.सहाय्यक-विनोद पवार , सर्व आरोग्य सेवक, सर्व आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तक, सर्व आशा सेविका, व प्रा.आ.केंद्र लासूर चे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

