चोपडा येथे सेवानिवृत्ती कर्मचारीचा सत्कार

 

चोपडा येथे सेवानिवृत्ती कर्मचारीचा सत्कार

     चोपडा दि.१३(प्रतिनिधी)येथे राज्य परिवहन महामंडळातून सेवानिवृत्ती झालेले सुदाम रामदास करणकाळ तसेच बापू त्रिंबक बहारे ग्रेडेड मुख्याध्यापक वेले यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने छोटू वारडे व मित्र परिवार ) यांनी शासकीय विश्रामगृह चोपडा येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राध्यापक दिलीप पंडित सपकाळे यांनी स्वीकारले.

     यावेळी सत्कारमूर्ती सुदाम रामदास करणकाळ तसेच ग्रेडेड मुख्याध्यापक  बापू बहारे   यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी रमेश ज्ञानोबा शिंदे नगरसेवक, वंदनाबाई सुधाकर बाविस्कर नगरसेवक, अशोक राजाराम बाविस्कर माजी नगरसेवक,भरत भीमराव शिरसाठ (अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा चोपडा), विजय कढरे ,मोहन फुगारे (माजी कस्टम अधिकारी ),सुभाष वारडे, संतोष बाविस्कर, प्राध्यापक पानपाटील पूर्णानंद वारडे, हिलाल वारडे , रवींद्र वाडे,  छोटू सोनवणे, भीमराव उमाळे,निर्मल अहिरे, कुलभूषण डोळे, अनिल वाडे,यांनी सेवानिवृत्ती कर्मचारी यांचे शाल गुच्छ देऊन सत्कार केला तसेच समाज उपस्थित होते.

 यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी सुदाम करणकाळ व बापू बहारे यांच्या विषयी मान्यवरांनी त्यांच्या कार्यकाळाबाबत मनोगत व्यक्त केले.    सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुखदेव लक्ष्मण बाविस्कर (आडगाव) यांनी केले.तसेच शेवटी कार्यक्रमाचे आभार पूर्णानंद वारडे यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने