वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मुलगा देश सेवेसाठी सैन्य दलात भर्ती.. जवान "क्रीश धनगर"वर सुदर्शन कॉलनीत पुष्प सुमनांची उधळण

 वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत  मुलगा देश सेवेसाठी सैन्य दलात भर्ती.. जवान "क्रीश धनगर"वर सुदर्शन कॉलनीत पुष्प सुमनांची उधळण


चोपडा दि.१५(प्रतिनिधी) : बुधगाव येथील रहिवासी  तथा बीएसएफचे एएसआय उखर्डू सुखदेव धनगर  यांचे सुपुत्र क्रीष उखर्डू धनगर हा भारतीय सैन्य दलात एसआरपीएफ मध्ये भरती झाला असून वडिलांप्रमाणेच  पाऊलावर पाऊल टाकत देशसेवेसाठी सज्ज झाल्याने  गावासह सुदर्शन नगरातील रहिवासींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.संपूर्ण परिसरातील निवासितांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

क्रीष धनगर याने अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर  हे यश संपादन केले आहे. "ध्येय निश्चित असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते," हे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या यशामुळे अनेक युवकांना प्रेरणा मिळणार आहे. हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण परिसरातील तरुणांना अभिमानाची बाब ठरली आहे. 

वडील सुखदेव धनगर यांनीही  देशसेवेसाठी स्वतः स झोकून घेतले असून बीएसएफ मध्ये एएसआय पदावर इमाने ईदबारपणे कामगिरी बजावत आहेत . त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत मुलगा "क्रीश"नेही देशसेवा अंगीकारून भारतीय सैन्य दलात प्रवेश केला आहे त्याचे ट्रेनिंग सेंटर लवकरच मिळणार असून तो देशसेवेसाठी सज्ज झाला आहे. 91 टक्के गुण मिळवत एस आर पी एफ मध्ये दाखल झाला आहे त्यामुळे त्याच्यावर अभिनंदन वर्षाव होत आहे .

जवान क्रीश धनगर  यांच्या यशाबद्दल जेडीसीसी बॅंकेचे  सतीश पाटील, काळू धनगर, भास्कर कोळी, स्वप्निल कोळी, शरद पाटील, एम. आर. पाटील ,रमेश धनगर ,ईश्वर धनगर व सुदर्शन कॉलनी मित्र मंडळ परिवाराने सत्कार  करीत पुढील देश सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने