चौगाव येथे दीपप्रकाश फाउंडेशनच्या शाळेचे उद्घाटन
चोपडा,दि.१४ (प्रतिनिधी ); तालुक्यातील चौगाव येथील दीपप्रकाश फाउंडेशन संचालित केएसटी स्मार्ट कीड्स् स्कूल (मातोश्री कल्पना ताई सखाराम तेले) या शाळेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे म्हणून किसान विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल हिम्मतराव पाटील, महात्मा गांधी हायस्कूल लासूर चे मुख्याध्यापक श्री .पाटील, पत्रकार अजय पालीवाल, निसर्गप्रेमी तथा पत्रकार विश्राम तेले, पाळधी गावचे ज्येष्ठ नागरिक प्रकाश कळूबा धनगर, भगवान काळे, व गावचे पोलीस पाटील गोरख हरचंद्र पाटील, संस्थेचे सदस्य वामन शिंदे, अनिल पाटील,गावातील बहुसंख्या शिक्षण प्रेमी नागरिक, उपस्थित होते..
दीपप्रकाश फाउंडेशन चे खजिनदार सुनिल धनगर तसेच संस्थेच्या अध्यक्ष आणि संचालिका दीपमाला सुनिल धनगर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या संचालिका दीपमाला धनगर यांनी आश्वासन दिले की या शाळेत येणारा प्रत्येक विद्यार्थी हा सुसंस्कृत आणि सर्व गुण संपन्न होईल तसेच गावातील बहुसंख्या विद्यार्थी हे शाळेत पाठवावे असे आवाहन केले.यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
