विश्वशांतीसाठी चोपडा येथे गो पुष्टी यज्ञ संपन्न
चोपडा,दि.१३(प्रतिनिधी) शहरातील श्रीराम नगर येथे गो भागवत कथेच्या सातव्या दिवशी सकाळी पाच वाजता विश्वशांतीसाठी व गोमातेच्या संरक्षण व संवर्धनासाठी गो पुष्टी यज्ञ संपन्न झाला.
के.डी. चौधरी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमृत महोत्सव समिती व संत जगनाडे जगदीश गोपाल गोशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गोभक्तांच्या वतीने यज्ञ संपन्न झाला. यज्ञाचे यजमान म्हणून के.डी.चौधरी सर यांनी गोभक्तांच्या माध्यमातून आहुत्या दिल्या. गोप्रेमी संत दिनेश जी महाराज यांच्या अमृतवाणी द्वारे मंत्रोचारात आहूत्या देण्यात आल्या. आहुत्या देणाऱ्यांमध्ये अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष टी. एम. चौधरी व गो शाळेचे अध्यक्ष देवकांत चौधरी, विश्वस्त सूर्यकांत चौधरी व गो भक्त मोरे आप्पा,राजेंद्र चौधरी, लखन भाई तेली तसेच अनेक गोभक्तांनी व गो सेवक मातांनी आहुत्या देऊन विश्वशांतीची व गोमातेच्या संरक्षण व संवर्धनाचे यज्ञ देवतेची आराधना केली. यावेळी सकाळी पाच वाजता मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. अनेकांनी आपल्या आहुत्या देऊन यज्ञ देवतेची विधीवत पूजा केली.
