चोपडा शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई.. कुंटणखान्याचा सुपडा साफ ♦️नेपाळ ,राजस्थान व चोपडा मधील सहा महिलांकडून देह व्यापार चालविणाऱ्या 11 जणांवर गुन्हा..पिडितांची सुटका

 

चोपडा शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई.. कुंटणखान्याचा सुपडा साफ 

 ♦️नेपाळ ,राजस्थान व चोपडा मधील सहा महिलांकडून  देह व्यापार चालविणाऱ्या 11 जणांवर गुन्हा..पिडितांची सुटका 

चोपडा दि.30 चोपडा शहरातील तहसील कार्यालयाच्या मार्गाने स्मशान भूमी कडे जाणाऱ्या रोड लगत मोकळ्या जागेत पत्राच्या झोपड्यांमध्ये वेशा व्यवसाय करणाऱ्या कुंटनखान्यावर पोलिसांनी छापा घालून अवैधरित्या वेशा व्यवसाय करवून घेणाऱ्या 2 जणांना अटक करण्यात असून 9 जण फरार झाले आहेत.दरम्यान राजस्थान व नेपाळ व चोपड्यातील एक महिला ,अशा एकुण सहा पीडितांना आश्रय देऊन देह व्यापार करून घेणाऱ्यांची पोलिसांनी धरपकड केल्याने  प्रचंड खळबळ उडाली आहे.यावेळी सहा पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.शहर पोलिसांच्या धडक कारवाईचे शहरभर जोरदार स्वागत होत असून पोलीसांच्या कार्याची जोरदार वाह वा..! होत आहे.

 जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत  धिवरे ,चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन प्रतापराव देसले यांच्या नेतृत्वात सपोनी एकनाथ भिसे, पोउनि युवराज वाळुंज,पोउनि सचिन चौधरी यांच्या पथकाने दुपारच्या सुमारास शहरातील एका हायस्कूलच्या मागे तहसील कार्यालयाच्या मार्गाने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रोड लगत असलेल्या मोकळ्या जागेतील पत्रांच्या झोपड्यांमध्ये  कुंटणखाना सुरू असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलीस छापा मारला.त्यात नेपाळ, राजस्थान व चोपडा येथील सहा महिलांकडून स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी आश्रय देऊन वेश्याव्यवसाय करून  घेणारे आढळून आल्याने शिल्पा राम लामा वय३५रा.चोपडा ,व पूजा टीकराम थापा वय २९ रा.चोपडा या दोघांना अटक करण्यात आली आहे.तर शिवाजी भीमराव पाटील, फरीद कदीर शेख, शाहरुख वाहिद खान, शरीफ रमजान तेली, कालू उर्फ रंजीत चौधरी ,फिरोजी इशा खान ,बापू उर्फ जितेंद्र रावण वाडे, संदीप उर्फ सोनू लक्ष्मण पाटील, सुरेंद्र राजपूत चोपडा हे फरार झाले आहेत. 

याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस  कॉन्स्टेबल मदन रतिलाल पावरा  यांच्या फिर्यादीवरून सी सी टीएनएस गुरनं 224 ऑब्लिक 2006 स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार,(प्रतिबंध) अधिनियम 1956 (PITA)  च्या कलम 3 ,4,5,7  व भारतीय न्यायसहिता कलम 143 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन प्रतापराव देसले हे करीत आहेत .

...........चौकट..............................................

 वायू वेगाने कारवाया म्हणून "पवन" नाव सार्थकी..पोनि देसलेंचा चोपड्यात धडाका..! 

चोपडा शहर पोलीस स्टेशनचा पदभार हाती घेताच पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध धडाकेबाज  फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे, गांजा ,गावठी कट्टा ,अवैध गुरे गायी कत्तल,  अवैध देह व्यापार ,बालविवाह रोखधाम, अशा सर्वच अवैध प्रकारावर लगाम लावण्याच्या धुमधडाका लावला आहे.त्यामुळे पोनि पवन देसले यांच्या रूपाने चोपड्याला धडाकेबाज निडर "सिंघम "लाभल्याची प्रतिक्रिया जनसामान्यांतून उमटत आहे. "पवन" नावाप्रमाणेच वायू वेगाने कारवाया सुरू असल्याने खऱ्या अर्थाने नाव सार्थकी लागत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

.........................................................................

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने