हिंदू जागरण मंचची अवैध कत्तलखान्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी
चोपडा,दि.३१ (,प्रतिनिधी) हिंदू जागरण मंचची अवैध कत्तलखान्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी चोपडा पोलीस निरीक्षक आणि चोपडा नगर पालिका यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
जुन्या यावल रोड भागातील शेतपुरा येथे कत्तलखाना प्रशासनामार्फत बंद करण्यात आला होता. तरी या बकरी ईद ला सदर कत्तलखान पुन्हा सुरु असल्याचे निदर्शनास आले असून. यात जनावरांच्या कत्तली सुरु आहेत तसेच असे निदर्शनास आले कि, पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन व पशुवैद्रद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते.जर सदर कत्तलखान्यावर बंदी असेल तर याला परवानगी कोणी दिली याची चौकशी करावी. तसेच सदर कत्तलखाना पाडण्यात यावा अन्यथा सकल हिंदू समाज या प्रश्नावर आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्यावी. असे सकल हिंदू समाज, चोपडा तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.
सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देताना यावेळी पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम, नगरसेवक तथा भाजपा शहराध्यक्ष डॉ.रोहन पाटील , मितेश भावसार , अशोक शिंपी,सागर नेवे, जीगणेश कंखरे, आकाश भोई , हरीष माळी , प्रेम भावसार, गौरव सोनार, सुनिल शिवगीते , संजय श्रावगी, ,देविदास साळुंखे , आदित्य माळी , प्रेम घोगरे, सिद्धांत पाटील , राज मिस्तरी, दुर्गेश पाटील, आदित्य माळी, भुषण भोई, विवेक महाजन, हर्षल महाजन,राहुल चौधरी, सत्यम पारधी, योगराज ठाकरे, विकी पारधी, समाधान तोरण, प्रनव्ह गुजर, विश्वास भोई , प्रविण महाजन, शुभम माळी, राहुल पाटील, अमोल गोंगूर्डे, कृष्णा काळे, पंकज नरवाडे,आकाश कोळी, दिनेश चौधरी, संग्राम परदेशी , कुणाल चव्हाण, रोहित पाटील, आर जे पाटील हे उपस्थित होते.
