सेंसाई अतुल लोहार यांना ब्लॅक बेल्ट 2nd Dan बहाल..ओकीनावा मार्शल आर्टस् अकॅडेमी व जापन कराटे शोतोकाई इंडियाकडून सन्मान
चोपडा ,दि.२७(प्रतिनिधी): बिनोरीयो कराटे दो असोसिएशन, पुणे आयोजित दि. २४ मे २०२६ रोजी पुणे येथे ओकीनावा मार्शल आर्टस् अकॅडेमी व जापन कराटे शोतोकाई इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लॅक बेल्ट परीक्षा उत्साहात पार पडली. या परीक्षेत सेंसाई अतुल बी. लोहार यांनी उल्लेखनीय यश संपादन करून ब्लॅक बेल्ट 2nd Dan मानांकन प्राप्त केले.
ओकीनावा मार्शल आर्टस् अकॅडेमी आणि जापन कराटे शोतोकाई इंडिया मान्यताप्राप्त ब्लॅक बेल्ट 2nd Dan म्हणून सेंसाई अतुल लोहार यांचा शिहान दत्ता शेलार सर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या परीक्षेसाठी ज्ञानेश्वर सोनवणे सर व सेंसाई मुकेश कथवटे सर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच सेंसाई विजय पवार, यांनी ब्लॅक बेल्ट परीक्षेचे नियोजन केल्याबद्द विशेष आभार. सेंसाई समीर शेलार, सेंसाई,बालाजी कुंभार आदी प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून मोलाचे योगदान दिले.
बिनोरीयो कराटे दो असोसिएशन महाराष्ट्राचे संस्थापक, अध्यक्ष व मार्गदर्शक शिहान दत्ता शेलार सर यांनी ब्लॅक बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ब्लॅक बेल्ट प्रदान करून त्यांचा गौरव केला.
यावेळी ओकीनावा मार्शल आर्टस् अकॅडेमी व जापन कराटे शोतोकाई इंडिया यांच्या मुख्य शैली प्रमुख एस. श्रीनिवासन यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मार्शल आर्ट्समुळे शिस्त, आत्मविश्वास व स्वसंरक्षणाची भावना विकसित होते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
