चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश


 चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश

​चोपडा दि.२८(प्रतिनिधी)शहर पोलीस स्टेशन पोनि पवन देसले व पथक Psi युवराज वाळुंज, PC विलास पारधी pc निलेश वाघ यांनी गुप्त माहितीच्या आधारावर  एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह तात्काळ वेळेत भेट करून हस्तक्षेप करून यशस्वीरित्या थांबवला आहे. 

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शहरात एका ठिकाणी बालविवाह होणार होता.​घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन विवाह रोखला. पोलिसांनी दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन करून बालविवाहाच्या कायदेशीर परिणामांची जाणीव करून दिली. मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याने हा विवाह बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करण्यात आले. विवाहाच्या वेळी मुलीचे वय १८ वर्षे आणि मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. या वयापेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींचा विवाह हा कायदेशीर गुन्हा मानला जातो. बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार, बालविवाह करणे, लावून देणे किंवा त्यास प्रोत्साहन देणे या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. बालविवाह करणारे वर-वधू, त्यांचे पालक, नातेवाईक, लग्न लावणारे भटजी, पत्रिका छापणारे, मंगल कार्यालय व्यवस्थापक, केटरर्स आणि उपस्थित असणारे सर्व दोषी मानले जातात. ​या कारवाईत पोलीस निरीक्षक पवन देसले आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. "बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी," असे आवाहन चोपडा शहर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने