गणपुर विकास विद्यालयातून दर्शनी पाटील पहिली
गणपूर,ता चोपडा,दि. ९(प्रतिनिधी):येथील विकास माध्यमिक विद्यामंदिर शाळेचा दहावी चा निकाल 92% लागला असून शाळेतून दर्शनी परेश पाटील 86% गुण मिळवून प्रथम आली. नेहा जितेंद्र वानखेडे 85.40% गुण मिळवून दुसरी तर उमेश्वरी धर्मराज वानखेडे 81.40% गुण मिळवून तिसरी आली.विशेष म्हणजे शाळेतून पहिल्या पाच सर्व विद्यार्थिनी आहेत. शाळेतून प्रथम आलेल्या दर्शनी पाटील चा पालकांसह शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक ए व्ही पाटील,वर्गशिक्षक ए बी सूर्यवंशी व सर्व शिक्षक उपस्थित होते........
गणपूर(ता चोपडा) दर्शना पाटील चा सत्कार कारतांना शिक्षक
