कु.काव्या नेवेला दहावीत ९१.८० गुण
चोपडा,दि.९(प्रतिनिधी)- येथील विवेकानंद विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी कु.काव्या रुपेश नेवे हिने मोठे यश प्राप्त केले आहे.तीला नुकत्याच दहावीच्या जाहिर झालेल्या निकालात ९१.८० टक्के गुण प्राप्त झाले आहेत.तीचे विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॅा.विकास हरताळकर,उपाध्यक्ष घनःश्याम अग्रवाल,सचिव ॲड.रवींद्र जैन संस्थेचे पदाधिकारी,मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांनी अभिनंदन केले आहे.चि.काव्या ही घोडगावच्या निकुंभ हायस्कूलचे उपशिक्षक रुपेश नेवे व पोलिस उपाधिक्षक कार्यालयातील पल्लवी नेवे यांची कन्या तर जेष्ठ पत्रकार श्रीकांत नेवे यांची पुतणी आहे.
