विरवाडे येथील विद्याभारती माध्यमिक विद्यालय विद्यार्थ्यांचे माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश
चोपडा,दि.९(प्रतिनिधी) तालुक्यातील विरवाडे येथील विद्याभारती माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत परीक्षेत यंदाही यशाची परंपरा कायम राखत विद्यालयाचा निकाल 80.32% टक्के लागला आहे.विद्यालयाचे एकूण 61 पैकी 51 उत्तीर्ण झालेत.
दोन विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवून
विद्यालयातून कु.देवयानी ज्ञानेश्वर सोनगिरे हिने 92.20% गुण मिळवत प्रथम क्रमांकावर बाजी मारली आहे.तर
पुनम अंबादास पाटील हिने 91.20%गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
तसेच जयेश रवींद्र कोळी याने (85.00%गुण )तृतीय क्रमांक व मोहित रामदास सपकाळे याने(84.20%)चतुर्थ क्रमांक
आणि मनीष जयपाल पवार याने (80.20%)पाचवा क्रमांकावर स्थान मिळविले आहे.
यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे
विद्याभारती बहुउद्देशीय शिक्षण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव, सर्व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.
----------------
