चोपडा म्युनिसिपल हायस्कूलमध्ये एस.एस.सी परिक्षेत राजु सोनवणे प्रथम तर साहिल बारेला द्वितीय
चोपडा दि.८( प्रतिनिधी): चोपडा शहरातील पीएमसी सावित्रीबाई ज्योती फुले माध्यमिक हायस्कूलच्या इयत्ता दहावीचा निकाल शेकडा ८३.८७टक्के लागला आहे . विद्यालयातून चि. राज सुरेश सोनवणे याने शेकडा 81.80% गुण मिळत विद्यालयातून प्रथम येण्याच्या मान मिळविला आहे.
फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये झालेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले असून विद्यालयातून चिरंजीव साहिल दिलीप बारेला याने शेकडा 80.20% गुण मिळत द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर समीर आबा पावरा याने 190.80% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन नगराध्यक्ष सौ नम्रता सचिन पाटील,उप नगराध्यक्ष पंकज बोरोले, शिक्षण सभापती अमोल पाटील, मुख्याधिकारी रामनिवास झंवर, उपमुख्य कार्य अधिकारी संजय मिसर, मुख्याध्यापक दीपक पवार व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
