विवेकानंद विद्यालयाची कु.स्वरा विनीत हरताळकर शेकडा १००%गुण मिळवत तालुक्यातून सर्वप्रथम..२३ गुणी विद्यार्थी ९०टक्क्यांचे वर गुण
चोपडा,दि.८(प्रतिनिधी): - येथील विवेकानंद विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शेकडा 99.28% टक्के लागला असून कु. स्वरा विनीत हरताळकर हिने शेकडा १००% गुण मिळवत तालुक्यासह विद्यालयातून सर्व प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. विद्यालयाच्या इतिहासात शंभर पैकी 100 गुण मिळवणारी ही पहिली विद्यार्थी ठरली आहे. यंदाच्या शाळेच्या निकालात 90% पेक्षा जास्त गुण मिळवणारे जवळपास 23 विद्यार्थी असून त्यांनी जबरदस्त चुणूक दाखवल्याने शाळेची छाप तालुक्यावर पाडली आहे.
गुणवत्ता यादीत झळकणारे चुणूकदार विद्यार्थ्यांचे नावे क्रमांक व टक्केवारी पुढील प्रमाणे
कुमारी सानवी अतुल पाटील 97.80% द्वितीय, चिरंजीव हर्षल भरत पाटील 97.60% तृतीय, कुमारी ऋतुजा किशोर पाटील 97.60% तृतीय ,चिरंजीव सोहम हितेश जैन 97% चतुर्थ
*90 पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे 23 विद्यार्थी पुढीलप्रमाणे*
सुबोध पाटील (९६.६०% ),यश अडावदकर (96%), पियुष चौधरी (95.20%), पूजा पाटील (94.20% ),यश वाघ (93.40% ),वेधश्री कापुरे (93.20% ),शरद पाटील (93% ),श्रेया माळी (93%), निशिका चौधरी( 92.40%), मेहुल कंखरे (92.20% ),कृषी पवार (91.80%), काव्या नेवे (91.80%), प्रणव पाटील (९०.८०%), मयुरेश शिंदे (90.80% ),जानवी पाटील (९०.६० ),टक्के हर्षल जाधव (90.40%) ,प्रदेश निकम (90.40%), कोमल पाटील 90%
यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास यशवंत हरताळकर, संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर , माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य पी जी पाटील,
इंग्लिश मिडियमच्या प्राचार्य
सौ. भारती पंजाबी,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.आशा चित्ते , बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका केंगे मॅडम यांनी प्रा.सौ गौरी शुक्ला , राकेश विसपुते, राधेश्याम पाटील,संजयलाठी,प्रा.श्री.संजय गवळी, प्रा.श्री.विक्की शर्मा,प्रा.श्री.कुणाल सोनार,
प्रा.साक्षी गुजराती ,श्री.प्रवीण पाटील, प्रा.श्री.घश्याम पाटील
आदिंनी अभिनंदन करून कौतुक केले.
.......... *चौकट* ..............
कु. स्वरा विनीत हरताळकर ही विद्यार्थिनी चोपडा शहरातील नामवंत धन्वंतरी डॉ. विकास काका हरताळकर यांची नात असून डॉ. अमित हरताळकर यांची पुतणी तर डॉ. विनीत हरताळकर यांची ही मुलगी आहे .तिने लहानपणापासूनच विविध परीक्षांमध्ये नैपुण्य दाखवत जिल्हा व राष्ट्र पातळीवर चमक दाखवली आहे.ती चोपडा तालुक्यातून १००पैकी१०० टक्के गुण मिळविणारी एकमेव विद्यार्थ्यांनी असून शैक्षणिक क्षेत्रात तिने तालुक्यातून इतिहास रचला आहे.तिच्या यशाबद्दलचे श्रेय आजोबा,वडील काका व शिक्षकांना जाते.तिच्या यशाबद्दल सर्वस्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
......................................
