कै.हि.मो. करोडपती माध्यमिक विद्यालयाची १००%निकालाची परंपरा कायम
चोपडा दि.९(प्रतिनिधी) शहरातील कै. हि.मो. करोडपती माध्यमिक विद्यालयाचा सन२०२५-२६ चा इयत्ता दहावीचा निकाल १००%लागला असून निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यंदा विद्यालयातून पहिला येण्याचा मान
सोनी सुकलाल पावरा या विद्यार्थीनीने मिळविला आहे. तिने शेकडा 87.20% गुण मिळवत आपली चुणूक दाखवली आहे.
विद्यालयातून प्रथम पाच येण्यात पावरा महेश रामचंद 86.00% द्वितीय,पावरा रंजना विश्राम85.20%तृतीय,
भाट विनय दिपेश ९८-१०% चतुर्थ ,पावरा मनोज देविदास 83.20%पाचवा, या विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पाटील, उपाध्यक्ष विजय करोडपती, डॉ ए ओ पाटील सचिव पंकज बडगुजर, चेअरमन उमेश करोडपती बडगुजर,डॉ दिलीप पाटील,विठ्ठलराव पाटील,मुख्याध्यापक मंगेश भोईटे,वर्गशिक्षक आर आर बडगुजर, ए.पी बडगुजर, सी पी बडगुजर, व्ही बी साळुंखे, पी सी बडगुजर, एस टी बोरसे, दिपाली बडगुजर, शर्मिला बडगुजर, लिपिक संजोग साळुंखे, अशोक बडगुजर, सुनील बडगुजर,विलास सनेर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.
