चोपड्यात राष्ट्रीय लोक अदालततीत ७७प्रकरणे निकाली..साडे सतरा लाखांची वसुली

 चोपड्यात राष्ट्रीय लोक अदालततीत ७७प्रकरणे निकाली..साडे सतरा लाखांची वसुली

चोपडा दि.१०(प्रतिनिधी):- उच्च न्यायालय मुंबई व जिल्हा  विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये दि.09 मे 2026 शनिवार रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते यात दिवाणी व फौजदारी प्रलंबित 900  प्रकरणापैकी 77 तर दाखलपूर्व प्रकरणे  बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया,  सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बीएसएनएल, महसूल व म.रा.वि. मंडळाच्या दाखलपूर्व  1861 प्रकरणापैकी  6 प्रकरणं निकाली झाले तर एकूण   17 लाख 55 हजार 831रुपयांची वसुली झाली आहे

         सकाळी 10.30 वाजता  राष्ट्रीय लोक अदालतला सुरुवात झाली. यावेळी पॅंनलवर दिवाणी न्यायाधीश  एस. डब्ल्यू. शेगोकार यांच्या सह पंच म्हणून ॲड. एच. एम. सय्यद व चोपडा वकील संघाचे सदस्य व सरकारी अभियोक्ता  नितीन माळी  , चोपडा तहसीलदार  भाऊसाहेब थोरात  तसेच नायब तहसीलदार  योगेश पाटील , ग्राम विस्तार अधिकारी जे. पी.पाटील  हजर होते. चोपडा न्यायालयातील दिवाणी व फौजदारी प्रलंबित  900 प्रकरणे ठेवण्यात आले होते त्यातून  फौजदारीचे  41 प्रकरणे, धनादेश अनादर 09 प्रकरणे, दिवाणी  27 प्रकरणे अशी एकूण 77 प्रकरणें निकाली काढण्यात आले यात 12 लाख 29 हजार 831 रुपये वसूली झाली.  बँक,मराविम  व बी एस एन एल दाखल पूर्व प्रकरणे यांची एकूण 1861 प्रकरणातून 6 प्रकरणे निकाली झाले यात 5 लाख 26 हजार  रुपये वसूल करण्यात आले.   अशी एकूण 17 लाख 55 हजार 831 रुपये वसूल करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी बार असोसिएशनचे वकील सदस्य,  पोलिस कर्मचारी, सहाय्यक अधीक्षक, न्यायालयीन कर्मचारी, बँकेचे शाखा अधिकारी व म. रा.वि .मंडळ व  बी.एस. एन. एल.चे अधिकारी यांचे सहकार्य लाभले. पॅनल प्रमुख यांनी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल  सर्वांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने