एनएमएमएस परीक्षेत पंकज माध्यमिक विद्यालयाचे 23 विद्यार्थी गुणवत्ता यादीत

 एनएमएमएस परीक्षेत पंकज माध्यमिक विद्यालयाचे 23 विद्यार्थी गुणवत्ता यादीत

चोपडा दि.५(प्रतिनिधी)राष्ट्रीय परीक्षा परिषद नवी दिल्ली तर्फे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक प्रज्ञाशोध अर्थात एनएमएमएस परीक्षेत चोपडा येथील पंकज माध्यमिक विद्यालयाचे 23 विद्यार्थी गुणवत्ता यादीत निवडले गेले. गुणवत्ता यादीत निवड झालेला प्रत्येक विद्यार्थी 48 हजार रुपये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे.

 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या या प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावी पर्यंत प्रतिवर्ष प्रत्येकी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते या परीक्षेत *आत्तापर्यंत विद्यालयाचे 309 विद्यार्थी पात्र ठरले आहेत.* यावर्षी गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल 11 लक्ष 04 हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त केलेली आहे. गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये


1) वैष्णवी भिमराव पाटील 

2) राजवीर भैय्या ठाकरे 

3) तन्मय संदीप पवार 

4) संस्कार शरद शिरसाठ

5) हर्ष लिलाधर पाटील 

6) हर्षदा गणेश वऱ्हाडे 

7) कार्तिक प्रमोद पाटील 

8) यश निंबा पाटील 

9) जयेश निवृत्ती पाटील 

10) वेदांत सुनिल चौधरी 

11) नेहा समाधान धनगर 

12) तेजस निलेश माळी 

 13) देवयानी चंद्रकांत चौधरी 

14) भाविका जितेश पाटील 

15) खुशी नितीन दाभाडे 

16) जिग्नेश राकेश पाटील 

 17) रितेश पंकज पाटील 

18) रितेश विश्वनाथ चौधरी 

19) नित्यश्री नितीन वाघ 

20) पियुष रवींद्र शिरसाठ 

21) मोहित दिपक बाविस्कर 

22) कोमल दिनानाथ पाठक 

23) प्रणित निरंजन पाटील


यांच्या समावेश आहे.

 या सर्व विद्यार्थ्यांना बी एम तायडे, वैशाली पाटील, जे एस मंडपे, मुख्याध्यापक व्ही आर पाटील व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व गुणवंतांचा, प्रतिसाद देणारे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थापक संस्थाध्यक्ष डॉ सुरेश पंडित बोरोले, संस्थाध्यक्ष पंकजभैया बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, सचिव गोकूळ भोळे, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक व्ही आर पाटील सह सर्व विभाग प्रमुख, शिक्षक , प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.  स्पर्धा परीक्षेतील या नेत्रदिपक यशाबद्दल पंकज माध्यमिक विद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने